कडुलिंब हे भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचे औषध आहे, ज्याचा वापर हजारो वर्षांपासून लोक करत आले आहे.आजच्या काळात कडुलिंबाच्या पानापासून आणि झाडापासून अनेक आयुर्वेदिक आणि मेडिकल औषधे बनवली जातात. कडुलिंबाच्या झाडातील प्रत्येक गोष्ट फायदेशीर आहे. अनेक मोठ्या आजारांवर उपचार केले जातात.
भारतात कडुलिंबाचे झाड घराजवळ असणे शुभ मानले जाते. शुभ मानण्याचे कारण हेच की त्या झाडापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन भेटतो.कडुलिंबाची चव कडू असली तरी ती जितकी कडू तितकी औषधी सुद्धा असतात.
🌳 कडुलिंबाच्या झाडाची थोडक्यात माहिती 🌳
कडुलिंब, ज्याला इंग्रजी शब्दामध्ये Azadirachta indica असेही म्हणले जाते. कडुलिंबाची झाडे 15-30 मीटर (49-98 फूट) उंचीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना आकर्षक गोलाकार मुकुट आणि जाड फुरोची साल असते. दाट आणि हिरव्या कलर ची पाने दिसायला खूप सुंदर दिसतात. परंतु तीव्र उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ती पाने मोठ्या प्रमाणात गळून पडतात.
कडुलिंब ही वनस्पती सामान्यता बियाण्यापासून उगवली जाते. परंतु या वनस्पतीचा लावण्यासाठी कटींग्स करून सुद्धा उपयोग केला जातो. कडुलिंब ही वनस्पती खूप लवचिक असते आणि ती खडकाळ जमिनीमध्ये चांगली वाढते. कडुलिंब ही वनस्पती विविध प्रकारच्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरते.परंतु अतिप्रमानामध्ये तापमान किंवा अति पाणी साचल्याने मुळे कमकुवत होत जातात. त्यामध्ये ही वनस्पती टिकू शकत नाही. ते म्हणलेच आहे अति तिथे माती. 😊
पोषण मूल्य 👌💪
विटामिन के (Vitamine k) | १२.४ % |
कैल्शियम | ३२.८ % |
मैगनीशियम | २५ % |
सोडियम | २३.७ % |
फास्फोरस | १७.२४ % |
नाइट्रोजन | २० % |
💇 त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचे फायदे 💇
मुरुमांवर उपचार करते (Acne) :
- मुरुम झाल्यास कडुलिंबाची पाने ठेचून त्वचेवर लावल्यास मुरुमांपासून आराम मिळतो आणि त्वचेवर पुरळ येणे थांबते. याशिवाय या झाडाच्या पानांचे सेवन केल्याने शरीरामधील उष्णताही कमी होते.
चेहऱ्यावरील टॅनिंगला कमी करते (Tanning) :
- जास्त वेळ उन्हात उभे राहिल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि त्वचेवर टॅनिंग होते.उन्हामुळे काळे झालेल्या त्वचेवर कडुलिंबाच्या पानांचा फेस पॅक लावल्याने टॅनिंग दूर होऊ शकते.
-
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही ही पाने सुकवा आणि त्यांची पावडर बनवा आणि या पावडरमध्ये दही मिसळून ती चेहऱ्यावर लावा.यामुळे चेहऱ्यावरची उष्णता किवा गरमपणा लगेचच कमी होतो .
चेहऱ्यावरील चमक (Glow) :
- कडुलिंबाच्या पानांच्या पावडरमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची चमक आणखी वाढते. हळदीशिवाय कडुलिंबाच्या पानांमध्ये काकडीचा रसही टाकू शकता.
- जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा (पाने बारीक करा), ती पेस्ट त्यावर लावा आणि ही पेस्ट काही मिनिटे तशीच राहू द्या. काही वेळानंतर तुम्ही ही पेस्ट पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. ही पेस्ट आठवड्यातून तीनदा काळ्या वर्तुळांवर लावल्याने ती लवकर कमी होतात.
कडुलिंबाचे आरोग्य फायदे ( आरोग्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे फायदे) 🧘
रक्त शुद्धीकरण (Blood Purify) : कडुनिंबाच्या पानांमध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया मारण्याची शक्ती असते. म्हणूनच त्याची पाने खाल्ल्यास शरीरातील रक्त स्वच्छ होते आणि शरीरातील घाणेरडे बॅक्टेरियाही नष्ट होतात.
मधुमेहावर नियंत्रण : कडुनिंबाच्या पानांवर केलेल्या अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, ही पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत आणि ज्यांना मधुमेहाच्या तक्रारी जास्त आहेत, त्यांनी त्याची पाने नियमित खाल्ल्यास त्यांना या आजारापासून आराम मिळतो.
मलेरिया रोगात फायदेशीर : बर्याच देशांमध्ये, मलेरिया झालेल्या लोकांच्या उपचारादरम्यान कडुलिंबाचा वापर औषध म्हणून केला जातो. वास्तविक, याच्या पानांमध्ये आढळणारा गेडुनिन हा घटक या रोगाच्या उपचारात प्रभावी ठरतो आणि उच्च ताप कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच मलेरिया झालेल्या लोकांना कडुलिंबाची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो.
यूरिन संक्रमण : युरिन इन्फेक्शन झाल्यावर या पानांचे सेवन केल्यास या संसर्गापासून आराम मिळू शकतो आणि या संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांनी रोज सकाळी उठून त्याची पाने चघळल्यास या संसर्गापासून लवकर आराम मिळतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रण : कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर कडुनिंबाची पाने खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. म्हणूनच ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे, ते काही दिवस कडुलिंबाच्या पानांचे सेवन करून ही पातळी नियंत्रित करू शकतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढवणे : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील कडुलिंब खूप फायदेशीर आहे आणि त्याची पाने किंवा त्याच्या कॅप्सूल खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत केली जाऊ शकते.
किडनी स्टोन : किडनी स्टोन झाल्यास कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यास आराम मिळतो.पाणी तयार करण्यासाठी, पिण्याच्या पाण्यात कडुलिंबाची पाने काही वेळ उकळवावी.आणि ती चांगली उकळली की, पाणी गाळून थंड करून ठेवा. पाणी थंड झाल्यावर ते प्या, चांगल्या परिणामांसाठी हे पाणी काही दिवस सतत प्या.
पोटासाठी उपयुक्त : कडुलिंबाच्या पानांचा पोटाच्या अनेक समस्यांवर प्रभावी प्रभाव पडतो आणि त्याची पाने खाल्ल्याने,अॅसिडिटी,बद्धकोष्ठता, पोटदुखी या समस्यांपासून आराम मिळतो. म्हणूनच सकाळी व्यायाम करायला गेलात तर कडुलिंबाची दोन-तीन पाने तोडून खावीत.
कडुलिंबाची पाने खाण्याची योग्य वेळ
कडुलिंबाची पाने सकाळी अनेकजण खातात तर अनेकजण संध्याकाळी त्याची पाने खातात. मात्र, जे लोक सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करतात, त्यांच्या पानांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे शक्य असल्यास सकाळी याचे सेवन करावे.
One thought on “कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे : Neem Leaves Hair, Skin, Health Benefits”