पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi

आजकाल पोटदुखी किंवा अपचन होणे ही एक कॉमन सेन्स ची गोष्ट झाली आहे. ही वेळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीना कधी येते.दुनियेमध्ये असा कोणी व्यक्ती नाही ज्याच्या जीवनामध्ये ही समस्या कधी आली नाही. किंवा कधी येणार नाही.पोटदुखी ही एक कॉमन गोष्ट आहे. यावर घरगुती उपाय सुद्धा खूप सोपे आहे

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi

पोटदुखीचे कारण :

पहिले आपण पाहूया पोटदुखीची नेमकी कारणे कोणती आहेत. कारण ज्या गोष्टीचे कारण आपल्याला माहित असते त्या गोष्टीवर उपाय करणे खूप सोपे असते. नाहीतर तीच चुक आपल्याकडून पुन्हा पुन्हा होत राहते.

नेहमीची कारणे :

1) खूप जास्त जेवण करणे

2) एकाच वेळी खूप पाणी पिणे

3) तेलकट, तिखट-मसालेदार अन्न दीर्घकाळ खाल्ल्याने.

4) अशुद्ध पाणी पिन्यामध्ये येणे

5) वडापाव,पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, समोसा इत्यादी      बाहेरचे पदार्थ जास्त खाण्यामध्ये आल्याने

6) रिकाम्या पोटी बरेच तास काम करणे

7) रात्रीचे शिल्लक राहिलेले शिळे अन्न खाऊन

8) महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी

9) अधिक अंकुरलेली कडधान्ये खाल्ल्याने

10) कोरडे मांस ( ड्राय मिट )खाल्याने

11) अन्न खाल्ल्यानंतर खूप वेगाने धावणे.

पोदुखीची नेमकी लक्षणे :

1) पोटामध्ये जळजळ होणे.

2) पोटामध्ये गुडगुड होणे (bloating)

3) अम्लीय ढेकर देणे

4) ताप येणे

5) उलट्या मळमळ होणे

6) पोट फुगणे किंवा जड वाटणे

7) लघवी करताना अधूनमधून ओटीपोटात दुखणे

10 तुमच्या रोजच्या जेवणातील गैरसमज/वस्तुस्थिती click

घरगुती नैसर्गिक उपाय :

  • लिंबाच्या रसाचे मिश्रण पोटदुखीवर फायदेशीर :(Lemon juice mixture : Home remedy for Stomach pain)

5 मिली लिंबाचा रस, 5 तुकडे काळी मिरी पावडर आणि 1 ग्रॅम सुंठ पावडर आणि 1/2 ग्लास कोमट पाणी हे सर्व एकत्र करून सकाळ-संध्याकाळ 2 दिवस दिल्यास पोटदुखी आणि उलट्यांमध्ये आराम मिळतो.

  • काळे मीठ पोटदुखीपासून आराम देते :(Black salt helps to feel comfort in Stomach pain)

काळे मीठ, सुंठ, हिंग, समप्रमाणात एकत्र करून पावडर बनवा आणि नंतर 2-2 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ नाश्ता व रात्री जेवणानंतर कोमट पाण्याने प्यावे, छातीत जळजळ आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

  • लसणाचा रस पोटदुखी आणि गॅसपासून आराम देतो

एक चमचा लसणाचा रस आणि 3 चमचे साधे पाणी एकत्र मिसळून एक आठवडा रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेवणानंतर घ्यावे.  याचे सेवन केल्याने गॅस आणि पोटदुखीला आराम मिळतो.

  • पुदिना, मध आणि लिंबू

10 मिग्रॅ.दोन चमचे पुदिन्याचा रस, 10 मिग्रॅ.दोन चमचे मध, 2.5 मिग्रॅ लिंबाचा रस, 20 मिग्रॅ. ताजे पाणी एकत्र करून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

2 thoughts on “पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom