नवरी मिळे हिटलरला: 6 जानेवारी आजच्या भागाची समीक्षा
🎁 गिफ्ट आणि सरप्राईझ
या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजें लीला साठी जे गिफ्ट सिलेक्ट केलेलं असतं ते घेऊन विश्वा एजेंट कडे येतो. एजें ते गिफ्ट दाखवतो त्यामुळे एजे खूप खुश होतात. त्यानंतर विश्वा त्यांना म्हणतो की सर तुमच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे आणि मग तो एक बॉक्स एजें कडे देतो.
त्यामध्ये एक लॉकेट असते आणि त्यात एजे आणि लीलाचा फोटो असतो. मात्र ते बघून एजे म्हणतात की नाही, विश्वा मी हे लीला नाही देऊ शकत. विश्वा त्यावर उत्तर देतो की एजे सर, गिफ्ट देताना आपल्याला काय आवडतं याचा विचार करून चालत नाही, तर समोरच्याला काय आवडेल याचा विचार करावा लागतो.
😔 दुर्गाचा संघर्ष
दुसरीकडे दुर्गाला जेव्हा एजे आणि लीलाचं लग्न झालं होतं तेव्हाचा क्षण आठवत असतो. ती मनाशी म्हणते की लीला तू कुठून कुठपर्यंत आली आहेस. तेव्हा एजे तुझ्यासोबत संसार करायला तयार नव्हते आणि आता तेच एजे तुझ्या प्रेमात पडले आहेत.
मग तिला लीलाचा बोलणं आठवतं आणि तिला लीलाचा खूप राग येऊ लागतो. अचानक तिची तब्येत बिघडते आणि ती चक्कर येऊन खाली पडणार असते. इतक्यात किशोर त्या ठिकाणी येतो आणि दुर्गाला सावरतो.
💔 दुर्गाची काळजी
दुर्गाला खूप घाम येत असतो आणि धाप लागलेली असते. किशोर तिला समजावत म्हणतो की दुर्गा, तू प्लीज एवढी काळजी करू नको. सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल. काही झालं तरी एजे आणि लीला यांची लव स्टोरी सुरू होणार नाही.
किशोरच ते बोलणं ऐकून दुर्गा थोडी शांत होते. दुसरीकडे, एजे विश्वाला म्हणत असतात की आजची पार्टी लीलासाठी खूप स्पेशल आहे. आज सगळं काही मी ठरवल्याप्रमाणेच व्हायला हवं.
🎉 पार्टीची तयारी
किशोर दुर्गाला सांगत असतो की आजच्या न्यू इयर पार्टीमध्ये एजे आणि लीला यांच्या आयुष्यात खूप मोठा धमाका होणार आहे. तू काळजी करू नको, सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच होईल. त्यामुळे दुर्गा शांत होते.
आजी देवाकडे प्रार्थना करत म्हणत असतात की तुझ्या कृपेने या वर्षांमध्ये माझ्या अभिरामचा एकटेपणा दूर झाला. त्याचं आणि लीलाचं लग्न झालं, पण लग्न झाल्यापासून या मुलांनी खूप चड उतार बघितले.
Click लाखात एक दादा 6 जानेवारी click
📦 गिफ्ट आणि पार्टीची तयारी
दुसरीकडे, एजेंने सांगितल्याप्रमाणे विश्वा पार्टीचे सगळे तयारी करत असतो. एजे सुद्धा त्यांच्या खोलीत पार्टीसाठी तयार होत असतात. तयार झाल्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांनी लीला साठी घेतलेलं गिफ्ट बघतात.
ते म्हणत असतात की लीला, आय होप तुला हे गिफ्ट आवडेल. आज मी तुला इम्प्रेस करण्यात यशस्वी ठरेल.
👗 लीलाची आगमन
बाहेर जाण्यासाठी निघतानाच प्रमोद, विराज आणि किशोर हे सुद्धा छान तयार होऊन आलेले असतात. लक्ष्मी, सरू आणि दुर्गा सुद्धा त्या ठिकाणी येतात. हे तिघेजण त्या तिघींकडे बघतच राहतात.
तितक्यात मग विश्वा सुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याची खूपच धावपळ सुरू असते. प्रमोद त्याला विचारतो की विश्वा, आज काही स्पेशल आहे का? तू आज एवढी धावपळ का करतोय?
🥳 पार्टीची सुरुवात
विश्वा म्हणतो, आज खरंच खूप स्पेशल दिवस आहे कारण एजे सरांनी आजची पार्टी स्पेशली लीला मॅडम साठी ठेवली आहे. ते ऐकून प्रमोद आणि विराज खुश होतात. त्यांना असं वाटतं की नक्की आज एजे लीला प्रपोज करणार.
परंतु दुर्गा, लक्ष्मी आणि सरू यांचा चेहराच पडतो. लीलाचे आई-बाबा त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून सगळ्यांचा चेहराच पडतो.
🚪 अनपेक्षित आगमन
किशोर मात्र हसतच मनाशी म्हणत असतो की आता ही बाई इथे आली आहे म्हटल्यावर पार्टीमध्ये रंगत तर येणारच. आजी कालिंदीचं आणि लीलाच्या बाबांचं स्वागत करते, मात्र तीनही सुना रागातच त्या दोघांकडे बघत असतात.
प्रमोद आणि विराज त्यांना म्हणतात की तुम्ही असं का बघताय? ते सुद्धा आता आपल्या घरातीलच आहेत ना?
😡 दुर्गाची चिडचिड
लक्ष्मी म्हणते, हे लोक आणि आपल्या घरातले शक्यच नाही. कालिंदी आणि लीलाचे बाबा त्या सगळ्यांजवळ जातात. कालिंदी म्हणते, आम्ही इथे काय बिना आमंत्रणाचे आलो नाहीयेत. एजंटने स्वतः आम्हाला आमंत्रण दिलं.
दुर्गा तर अजूनच चिडते. कालिंदी लगेच ज्यूस पिण्यासाठी जाते आणि तिचं असं वागणं बघून लक्ष्मी म्हणते की या बाईला खरंच दुसऱ्यांच्या घरात कसं वागावं ते कळत नाही.
📞 यशची चिंता
तितक्यात सरस्वती म्हणते की ती रेवती तर इथे आली नाहीये आणि यश सुद्धा घरात नाहीये. ते दोघेजण नक्कीच कुठेतरी एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करत असतील. दुर्गा घाबरते आणि लगेच बाहेर येऊन यशला कॉल करू लागते, पण तो काही कॉल रिसीव्ह करत नाही.
किशोर त्या ठिकाणी येतो. तो दुर्गाला समजावतो की यश काय, आता लहान राहिलेला नाहीये. तू त्याला असं कंट्रोल नको करू.
💔 दुर्गाची चिंता
दुर्गा म्हणते, मला सुद्धा त्याला असं कंट्रोल करायला आवडत नाहीये, पण तो त्या रेवतीच्या प्रेमात पडलाय ना. म्हणून मला असं वागावं लागतं. किशोर म्हणतो, काळजी करू नको, होईल सगळं ठीक.
दुसरीकडे, लीलाचे बाबा कालिंदीला समजावत असतात की जरा नीट वाग. रेवती बद्दल काही खोटं बोलू नको.
🎊 पार्टीची सुरुवात
कालिंदी म्हणते की काही वेळा खोटं बोलावंच लागतं. ती मुलगी घरी एकटीच बसली आहे. जर इथे या पार्टीत आली असती, तर इथे किती मजा केली असती.
तितक्यात मग एजे सुद्धा त्या ठिकाणी येतात. सगळेजण त्यांना बघून खुश होतात आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
🕯️ लीलाची आगमन
आजीनं एजेना लीला बद्दल विचारतात. एजे म्हणतात, लीला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तिला तिचा वेळ घेऊ दे.
हे ऐकून सर्वांना आश्चर्यच वाटतं. लीलाचे बाबा कालिंदीला म्हणतात, बघ ना, आपली लीला किती नशीबवान आहे.
🌟 लाईट्स बंद करणे
दुर्गा म्हणते, एजे, प्लीज आपण पार्टीला सुरुवात करूयात कारण सगळ्यांचाच वेळ वाया जातोय. पण एजे म्हणतात, दुर्गा, मी आधीच सांगितलंय, लीला तिचा वेळ घेऊ दे. तिच्याशिवाय पार्टी सुरू होणार नाही.
हे ऐकून लक्ष्मी आणि सरू दुर्गाला म्हणतात, बघितलं ना वहिनी, एजेंच वागणं किती बदलले ते.
💡 अनपेक्षित आगमन
तितक्यात विश्वा लाईट्स बंद करतो कारण त्याने लीलाची गाडी येताना बघितलेली असते. सगळ्यांना असं वाटत असतं की अचानक लाईट कशी काय गेली, पण हा सगळा एजेंटचाच प्लॅन असतो.
लीला घरात येते. सगळीकडे अंधार बघून ती खूप घाबरते. आजींना एजेंना आवाज देऊ लागते.
✨ लीलाचे आगमन
लीलाचा आवाज ऐकून मग एजे फक्त तिच्यावरच लाईट्स ऑन करतो. त्यावेळी लीलाचा अवतार बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो.
लीला खूप वेगळ्या प्रकारे तयार होऊन आलेली असते. ते बघून लक्ष्मी सर्व हसू लागतात कारण त्यांचाच हा सगळा प्लॅन असतो.
😢 लीलाची भावना
मग त्यानंतर विश्वा पुन्हा सगळ्या लाईट्स ऑन करतो. जेव्हा सगळेजण लीला बघतात, तेव्हा त्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते.
तर लीला सुद्धा जेव्हा सगळ्यांना बघते, तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. तिला कळून चुकतं की सरू आणि लक्ष्मीने तिला मुद्दाम चुकीची माहिती दिली आणि त्याचमुळे ती अशी तयार होऊन आलेली असते.
🔔 पुढील भागांची माहिती
मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या विडिओ अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप join करा