तुला शिकवीन चांगलाच धडा 4 जानेवारी आजचा भाग
या मालिकेच्या आजच्या भागात आपण शिवानी आणि अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी चाललेल्या असतात. त्याचवेळी अक्षराला आईचा कॉल येतो, आणि तिची आई तिला विचारते की, “अक्षरा बाळा, कुठे आहेस तू? शाळा सुटली का? आणि तू दुपारी व्यवस्थित जेवण केलस का? मी तुला फळ सुद्धा दिली होती ती तू खाल्ली की नाही?”
आईचे इतके सारे प्रश्न ऐकून अक्षरा हसून म्हणते की, “हो आई, मी दुपारी व्यवस्थित जेवण केलं. तू काही काळजी करू नको, फक्त मला घरी यायला थोडा उशीर होईल.” ते ऐकून आई काळजीने विचारू लागते, “अगं पण का? तू काही ज्यादाचा तास घेणार आहेस का?”
त्यावर अक्षरा म्हणते की, “नाही आई, तुला मी सांगितलं होतं ना की मी आज शाळा सुटल्यावर अधिपतींना भेटायला जाणार आहे.” आई खुश होते आणि म्हणते, “हो बाळा, तू अधिपतींना जा भेटायला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर ते चिडले ना तर तू शांत रहा. उगाच त्यांच्याशी वात घालू नको. तुमचं जे काही भांडण आहे ना, ते मिटवूनच घरी ये.” अक्षरा होकार देते आणि फोन ठेवते.
दुसऱ्या कडे, भुवनेश्वरी आणि दुर्गी अक्षरा आई होणार आहे या बातमीने खूप घाबरलेल्या असतात. दुर्गी म्हणते, “ताई, माझ्या मनात खूप शंका आहेत. जर हे सगळं अधिपतींना कळलं तर अधिपती त्या मास्तरडीला घरी घेऊन येणार, आणि मग आपल्याला या घरातून बाहेर जावं लागणार.”
भुवनेश्वरी विचारते, “आणि मग सूर्यवंशींची सगळी प्रॉपर्टी सुद्धा त्या मास्तरणीच्या आणि तिच्या मुलाच्याच नावावर होणार. मग आपण काय करणार? आपण तर रस्त्यावर येऊ. मला खरंच खूप भीती वाटते.” दुर्गी पुढे म्हणते, “एक वेळ अधिपतींच सुद्धा सोड.” भुवनेश्वरी उत्तर देते, “मात्र ही गोष्ट मोठ्या मालकांना कळली तर ते तिला डोक्यावर घेऊनच नाचतील. आपलं काही खरं नाही.”
Click नवरी मिळे हिटलर 4 जानेवारी click
भुवनेश्वरी म्हणते, “दुर्गे, तुझी भीती मला कळते, पण तू काळजी करू नको. मोठ्या मालकांचा कसा बंदोबस्त करायचा, त्याचा विचार मी करते. थोड्याच दिवसांमध्ये त्यांचा बंदोबस्त होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी ही बातमी आपल्या दोघीं व्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये.”
दुर्गी म्हणते, “ठीक आहे ताई, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते.” भुवनेश्वरी म्हणते, “आता काही झालं ना तरी सुनबाईंना आम्ही परत या घरात येऊ देणार नाही.” त्यांनी आमचा संसार मोडला, आमचं लग्न मोडलं, आता आम्ही त्यांचा संसार मोडणार आहोत. या घरापासून तर त्या दूर गेल्याच आहेत, पण आता आधीपासून आणि त्यांच्या आयुष्यापासून कशा दूर जातील, ते आता आम्ही बघतो.”
दुर्गी लगेच तिच्या एका माणसाला कॉल करते आणि अक्षराची काही अपडेट आहे का, असं त्याला विचारते. दुसरीकडे, अधिपती ओंकारला विचारतो की, “आपण नक्की कुठे चाललोय?” ओंकार म्हणतो, “ते तू मला काही विचारू नको. आता मी फक्त तुला तुझ्या बायकोच्या समोर उभं करणार आहे.”
अधिपती काळजीत पडतो, दुसऱ्या कडे अक्षरा सुद्धा खूप घाबरलेली असते. ती सतत शिवानीला वेगवेगळे प्रश्न विचारत असते. शिवानी हसून म्हणते, “वहिनी, किती घाबरला आहात? तुम्ही अजिबात घाबरू नका. आपण ना आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचू.”
शिवानी पुढे म्हणते, “आपण रंकाळ्या जवळच जाणार आहोत. मग तिथे तुम्ही आणि भाऊजी मस्त फिरा. तुमच्यामध्ये जे काही भांडण झाले, ते मिटवा आणि मग आनंदाने घरी जा.” अक्षरा खुश होते.
त्या दोघीजणी त्या ठिकाणी पोहोचतात. अक्षरा मनापासून शिवानीचे आभार मानते, आणि थोड्याच वेळामध्ये अधिपती आणि ओंकार सुद्धा त्या ठिकाणी येतात.
ते चौघेही जण त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. त्यावेळी अक्षराला तिच्या आणि अधिपतीने त्यांची पहिली अनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली होती, ते आठवतं. ती त्याच सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते.
अधिपतीने अक्षराला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं. त्या सरप्राईजमुळे अक्षरा खूपच खुश झालेली असते. मग ते दोघेजण एक खेळ खेळायचा ठरवतात, आणि त्या लोकांचे आभार मानायचे ठरवतात, ज्यांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी मदत केलेली असते.
सगळ्यात आधी, अक्षरा आभार मानते ते देवाचे, तर अधिपती त्याच्या आणि अक्षराच्या मैत्रीचे आभार मानतो. त्यानंतर अक्षरा अधिपतीचेच आभार मानते, आणि मग अधिपती आभार मानतो बजरंगचे.
तो हसतच म्हणतो, “जर त्या बजाने आपल्या दोघांना कोंडून ठेवलं नसतं ना, तर मग मी माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला सांगू शकलो नसतो.” अक्षराला हसू येतं.
अधिपती अक्षरा समोर गुडघ्यावर बसतो, त्याने तिच्यासाठी छान अंगठी आणलेली असते. तो पुन्हा एकदा अक्षराला लग्नाची मागणी घालतो. अक्षरा म्हणते, “अधिपती, हे काय? आपलं तर लग्न झालं आहे ना?”
अधिपती म्हणतो, “हो मास्तरीन बाई, पण तेव्हा तुमची आमच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती ना. मग आता दोघांचीही इच्छा आहे, तर पुन्हा एकदा सप्तपदी घेऊ.” अक्षरा खुश होते.
अधिपती तिच्या बोटामध्ये ती अंगठी घालतो, आणि मग ते दोघेजण पुन्हा एकदा सप्तपदी घेत एकमेकांना वचन देतात. त्यानंतर केक कट करत त्यांची पहिली अनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात.
हे सगळं काही जेव्हा अक्षराला आठवतं, तेव्हा ती खूपच खुश होते. आनंदानेच अधिपतींना भेटायला जाण्यासाठी निघते.
दुसरीकडे, भूवी देवी समोर उभी असते. ती म्हणते, “देवी, आम्ही जे काही ठरवलं आहे, ते तसंच होऊ दे. यामध्ये अधिपतींच कोणताही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.” ती पुढे म्हणते, “आम्ही सुनबाईंना पुन्हा कधीच या घरात येऊ देणार नाही.”
भुवनेश्वरी विचारते, “काय करायचं आहे ताई?” दुर्गी म्हणते, “मी मास्तरीन अधिपतींना भेटण्यासाठी निघाली आहे. ती शाळेतून घरी न जाता सरळ फॅक्टरीकडे जात आहे.” भुवनेश्वरी घाबरते.
अधिपती आणि अक्षराची भेट होते की नाही, हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या टेलिग्राम ग्रुप join करा