[su_dropcap]ह[/su_dropcap]नुमानाची मूर्ती भारत देशामध्ये तुम्ही अनेक जागी अनेक राज्यांमध्ये ,अनेक गावांमध्ये पाहिली असेल.जी सामान्यता मंदिरामध्ये असते आणि सामान्य उंचीची म्हणजेच जास्तीत जास्त 20-30 फुटापर्यंत पाहिली असू शकते,ही पण उंची काही व्यक्तींना जास्त वाटू शकते .परंतु आपल्या गावासार्खेच एक गाव आहे त्याचे नाव फरीदाबाद पाली आहे बर्याच मित्रांनी हे नाव कधीना कधी ऐकलेही असेल .तिथे तब्बल एक हनुमानाची मूर्ती ओपन स्पेस मध्ये आहे जी बनवण्यासाठी कारागिरांनी 9 वर्ष परिश्रम घेतले आणि जगामध्ये असणारी सर्वात उंच हनुमान मूर्ती बनवण्याचा मानही मिळवला आहे. पाहूया ह्या मंदिराबद्दल माहिती.
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
त्रिवेणी हनुमान मंदिर स्थापना कधी झाली ?👇
त्रिवेणी हनुमान मंदिर ही हनुमानाची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. हे हनुमान मंदिर फरीदाबादच्या पाली गावात, फरीदाबाद गुरुग्राम हायवेच्या मध्ये आहे.
या मूर्तीच्या उभारणीचे काम 2010 मध्ये सुरू झाले आणि 9 वर्षांच्या मेहनतीनंतर 2019 मध्ये पूर्ण झाले. मात्र, दरम्यानच्या काळात काही काळ बांधकामेही थांबवण्यात आली होती, मात्र अखेर ते पूर्ण झाल्यावर ते फरिदाबादमधील आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे.
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
त्रिवेणी हनुमान मूर्तीची उंची किती आहे ?👇
या मूर्तीची उंची 108 फूट आहे.
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
त्रिवेणी हनुमान मंदिराच्या दर्शनाची वेळ👇🙏
त्रिवेणी हनुमानाची मूर्ती खूपच आकर्षक आहे, त्याच्या शेजारी असलेले छोटेसे मंदिर बरेच जुने आहे आणि दर मंगळवार आणि शनिवारी येथे भाविकांची गर्दी असते. ही मूर्ती मेन हायवे च्या बाजूलाच असल्या कारणाने हायवेवरून जातानाही 108 फुट उंच असलेली मूर्ती खूप मोठ्या आकाराची दिसते.आणि तिथे थांबून दर्शन घेऊ वाटते.
जर तुम्ही त्रिवेणी हनुमान मंदिरात गेलात तर येथून फक्त 14 किमी अंतरावर असलेल्या अरवली हिल्सच्या मध्यभागी असलेल्या कॅम्प वाइल्ड धौजला तुम्ही भेट देऊ शकता.
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
त्रिवेणी हनुमान मंदिरात कसे जायचे ?👇
खर तर जाण्यासाठी तुमची स्वताची गाडी असेल तर खूप सोपे आहे.परंतु जर तुम्हाला मेट्रोने त्रिवेणी हनुमान मंदिरात यायचे असेल तर सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन लाखनी अरमान मेट्रो स्टेशन आहे. येथे आल्यानंतर तुम्ही त्रिवेणी हनुमान मंदिरात जाण्यासाठी ऑटो किंवा बसने जाऊ शकता. लाखनी अरमान मेट्रो स्टेशनपासून त्रिवेणी हनुमान मंदिराचे अंतर 6.5 किमी आहे. याशिवाय बाटा चौक मेट्रो स्टेशनवरून तुम्ही त्रिवेणी हनुमान मंदिरातही जाऊ शकता.
[su_divider top=”no” style=”double” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
आणखी पहा :👇