पारु – 26 डिसेंबर भाग new आजच्या भागाची समीक्षा
🌲 भागाची सुरुवात
या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू त्या डिरेक्टरला विनंती करतात की या जंगलातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मदत करा. तर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला मदत करतो, मात्र त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा मला मदत करावी लागेल.
🎬 डिरेक्टरची मागणी
आदित्य विचारतो की कशाची मदत, आणि त्यावर डिरेक्टर सांगतो की मगाचपासून आम्ही इथे एक सीन शूट करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आमच्या आर्टिस्टला तो सीन व्यवस्थितपणे करताच येत नाहीये. अक्षरशः मला आता वैताग आलाय. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हा सीन तुम्ही शूट करावा.
😲 पारूचा विरोध
ते ऐकून आदित्य आणि पारूला धक्काच बसतो. ते दोघेजण म्हणतात की नाही, नाही हे शक्य नाही. पण डिरेक्टर म्हणतो की मी तुमची लग्नाची ॲड बघितली आहे, तुमच्या दोघांसाठी अशक्य असं काहीच नाही. तुम्ही प्लीज माझी मदत करा, मग मी माझी गाडी देऊन तुम्हाला सुद्धा या जंगलातून बाहेर काढायला मदत करेल.
🤔 आदित्यचा विचार
पारू म्हणते की नाही, आम्हाला हे नाही जमणार आणि ती बाजूला निघून जाते. तर आदित्य तिला समजावत म्हणतो की पारू, आपल्याला हे करावच लागेल. कारण जर आपण यांना मदत केली तरच ते आपल्याला मदत करतील. नाहीतर आपल्याला या जंगलातच गोल गोल फिरत बसावं लागेल.
😟 देवी आईंचा विचार
पारू म्हणते की आदित्य सर, तुम्ही विसरलात का? जेव्हा देवी आईने ती लग्नाची जाहिरात बघितली होती तेव्हा काय घडलं होतं ते. आणि त्याचा तुम्हाला किती त्रास झाला होता. मग आता आपण जर हे सगळं केलं तर देवी आईंना काय वाटेल.
🙏 मारुतीची माफी
दुसरीकडे, मारुती हात जोडून अहिल्याची माफी मागत म्हणतो की माझी पारू अल्लड आहे आणि तिच्याचमुळे हे सगळं झालंय. कळतंय मला, पण तिच्या चुकीसाठी मी तुमची माफी मागतो.
💔 अहिल्याची चिंता
दामिनी म्हणते की मी तर आधीच सांगितलं होतं की त्या मूर्ख पारूला आदित्य आणि अनुष्का सोबत पाठवण्यापेक्षा मला जाऊ द्या. जर मी तिथे असते ना तर हे सगळं काही घडलंच नसतं.
🧐 श्रीकांतची प्रतिक्रिया
त्यावेळी श्रीकांत दामिनीवरच ओरडतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. तो मारुतीला म्हणतो की काळजी करू नको, पारूची यात काही चूक नसेल. आपली मुलं सुखरूप पणे घरी येतील.
🌲 जंगलातले विचार
आदित्य पारूला समजावत असतो की त्यावेळी आपण आईपासून खूप गोष्टी लपवल्या होत्या. पण यावेळी आपण असं नाही करायचं. आपण जंगलातून बाहेर पडल्यावर आपण ही जाहिरात का केली ते आईला सांगू. ती नक्की समजून घेईल.
😅 पारूची तयारी
आता पारू सुद्धा जाहिरात करायला तयार होते. ते दोघेजण डिरेक्टरला सांगतात की आम्ही तयार आहोत. त्यामुळे तो सुद्धा खुश होतो.
😩 अहिल्याची अस्वस्थता
दुसरीकडे, अहिल्या खूप अस्वस्थ असते. तिला सतत अनुष्काचं बोलणं आठवत असतं. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की अहिल्या, तू काळजी करू नको.
🤷♀️ अहिल्याचा प्रश्न
अहिल्या चिडूनच म्हणते की श्रीकांत, मला कळतच नाही की ती पारू अशी का वागते. माझी खात्री आहे की तीच हट्टाने जंगलात गेली असणार. आणि तिची जबाबदारी आदित्यवर आहे.
💔 अनुष्काची चिंता
पण या सगळ्यात ना मला अनुष्काचं वाईट वाईट वाटतंय. अरे, तिचं आणि आपल्या आदित्यच लग्न ठरलंय आणि आदित्य एका दुसऱ्या मुलीसोबत आहे. या गोष्टीचा तिला किती त्रास होत असेल याचा मी विचार करू शकते.
💖 आदित्यचा नशीब
मला खरंच ना, तिचं खूप कौतुक वाटतंय. आपला आदित्य नशीबवान आहे त्याला अनुष्का सारखी मुलगी मिळाली. आता फक्त त्या दोघांमधलं सगळं काही नीट व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.
🤔 श्रीकांतची सल्ला
त्यावर श्रीकांत म्हणतो की अगदी बरोबर बोललीस अहिल्या, तू काळजी करू नको. मात्र तितक्यात अहिल्या त्याला विचारते की श्रीकांत, असं तर नसेल ना रे की त्या पारूला आपला आदित्य आवडतो.
🎬 शूटिंगची तयारी
दुसरीकडे, डिरेक्टर आदित्य आणि पारूला शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जातो. तो त्या दोघांना सांगत असतो की पहिला सीन आदित्य सर तुमचा लागेल.
😂 पारूचा प्रतिसाद
आदित्य म्हणतो म्हणजे मला सुद्धा ऍक्टिंग करायची आहे का? आणि त्यावर तो डिरेक्टर म्हणतो की हो सर. तर पारू हसतच म्हणते की आदित्य सर, तुम्ही तर मला मगाशी खूप समजावत होताना आता तुम्ही सुद्धा ऍक्टिंग करा.
😅 आदित्यची तयारी
आदित्य नाईलाजाने तयार होतो. दुसरीकडे अहिल्याने गुरुजींना घरी बोलावून घेतलेलं असतं. ती म्हणत असते की गुरुजी, त्या दिवशी तुम्ही जे काही सांगितलं त्यानंतर मी आणि श्रीकांत दोघेही खूप अस्वस्थ आहोत.
🔮 गुरुजींचा सल्ला
गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी, मला माहिती आहे की तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे. मात्र मी जे काही सांगितलं ते माझ्या मनाचं नव्हतं. मला जे दिसलं तेच मी तुम्हाला सांगितलं.
😱 आदित्यची होणारी बायको
त्या मुलीचं आणि आदित्यच लग्न होऊ शकत नाही. आदित्याची होणारी बायको एका गरीब घरातील असेल आणि हेच सत्य आहे.
💭 अहिल्याची आशा
अहिल्या म्हणते की असं कसं? अनुष्का तर त्याला पसंत आहे आणि ती खरंच सर्वगुण संपन्न मुलगी आहे. ती आमच्या घराला आणि बिझनेसला व्यवस्थितपणे सांभाळू शकेल.
📅 मुहूर्त ठरवणे
त्यामुळे तीच या घरची सून होणार. तुम्ही फक्त त्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढा.
😒 दामिनीची शंका
दामिनी मात्र म्हणत असते की गुरुजी सांगतात त्याप्रमाणे की गरीब घरातील मुलगी पारू तर नसेल.
🎭 शूटिंगची सुरुवात
आदित्य तयार होऊन बाहेर येतो. तो डिरेक्टर त्याला सीन समजावून सांगतो. पारू हसतच हे सगळं बघत असते.
😄 पारूची अडचण
त्या शूटिंगला सुरुवात होते. मात्र पारूला सुद्धा आदित्यवर चिडता येत नाही. त्यामुळे डिरेक्टर म्हणतो की पारू मॅडम, तुम्ही असं समजा की हा तुमचा नवरा आहे.
😣 अनुष्काचा चेहरा
आणि तो तुम्हाला सोडून एका दुसऱ्या मुलीच्या मागे लागलाय. त्यामुळे तुमची खूप चिडचिड होते. आणि ते ऐकून पारूला तर सतत अनुष्काचा चेहरा समोर येतो.
🎬 शूटिंगची पुन्हा सुरुवात
तो डिरेक्टर तिला म्हणत असतो की आता तुम्हाला ऍक्टिंग करणं जमेल ना? आणि त्यावर पारू हो म्हणते. मग पुन्हा शूटिंगला सुरुवात होते.
😡 दामिनीचा राग
दुसरीकडे, दामिनीचं बोलणं ऐकून अहिल्या चिडलेली असते. ती रागातच दामिनी जवळ येते.
💢 अहिल्याची चेतावणी
तर दामिनी लगेच गालावर हात ठेवून उभी राहते. तर अहिल्या तिला म्हणते की, दामिनी, देवाने तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नको.
🧐 दामिनीची शंका
इथे माझ्या मुलाच्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओच्या लग्नाचा विषय सुरू आहे. इथे पारूच नाव सुजवण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली?
😱 दामिनीचा अंदाज
दामिनी म्हणते की, वहिनी मला माफ करा. पण मला जे जाणवलं ना, तेच मी बोलले. तुम्हाला असं वाटत नाहीये का की ती पारू सतत आपल्या आदित्याच्या मागे पुढे करत असते.
🕵️♀️ अहिल्याची काळजी
आणि तुम्ही हा कधी विचार केलाय का की त्या भर लग्नामधून तो हरीश अचानक गायब कुठे झाला असेल?
😰 पारूची शंका
मला तर असं वाटते की या सगळ्या मागे ना त्या पारूच काहीतरी प्लॅनिंग आहे. मात्र अहिल्या म्हणत असते की, दामिनी, तू उगाच वाटेल ते बोलू नको.
📺 पुढील भागांची माहिती
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा..