नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

 

नवरी मिळे हिटलरला: 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

 

🍚 लीला आणि एजेची खीर बनवण्याची कथा

या मालिकेच्या आजच्या भागात लीला आणि एजे शेवयांची खीर बनवण्यासाठी किचनमध्ये येतात. लीला तिचे एप्रॉन घालत असते, पण तिला त्याची काही गाठ व्यवस्थितपणे बांधता येत नाही. त्यामुळे एजे स्वतः तिला मदत करतात. हे बघून लीला खूपच खुश होते.

नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

त्यानंतर एजे त्यांची सिक्रेट रेसिपी लीला सांगतात. एजे सांगतील त्याप्रमाणे लीला शेवयांची खीर बनवायला सुरुवात करते. मात्र एका पॉईंटला लीलाच्या हाताला फटका बसतो. त्यामुळे एजे पटकन तिचा हात हातात घेतात आणि त्यावर हळुवारपणे फुंकर घालतात. हे बघून लीला एजे कडे पाहतच राहते.

नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

👏 खीरची चव आणि कौतुक

लीला खीर बनवून होते. एजे ती टेस्ट करतात आणि त्यांना ती खीर खूपच आवडते. त्यामुळे लीलाचा आनंद तर अगदी गगनात माविना असा होतो. ती एजेंना टाळी देण्यासाठी हात वर करते, मात्र एजे तिच्यापुढे शेक हॅन्ड करत असतात.

एजे खीर चव घेत आहेत

तत्कालीन आजी त्या ठिकाणी येतात. त्या म्हणत असतात की, “वा लीला, काही घमघमाट सुटला आहे खिरीचा.” त्यामुळे लीला खुश होते. त्यानंतर लीला आजींना सांगते की, “तुमच्या मुलाच्या हातात खरंच जादू आहे.” आजी हसतच म्हणतात, “हो का, मला तर माहितीच नव्हतं!”

🗣️ दुर्गाचा अपमान आणि घरातील ताण

Click करा पारू 30 डिसेंबर फुल एपिसोड click 

दुसरीकडे, दुर्गाने घरी येऊन जो काही अपमान केलेला असतो, त्यामुळे लीलाचे बाबा तर पूर्णपणे खचूनच गेलेले असतात. मात्र कालिंदी त्यांना म्हणत असते की, “असे हातपाय गळून चालणार नाही. आपल्याला आपल्या मुलीला त्याच घरात सून म्हणून पाठवायचंय हे लक्षात ठेवा.”

कालिंदी लीलाच्या बाबांना समजावत आहे

तरी बाबा म्हणतात, “तुला कळतंय का, तू काय बोलतीये? त्या दुर्गा मॅडमने आपल्या घरात येऊन आपली लायकी काढली.” कालिंदी म्हणते की, “मी तिला शिकवेल मान कसा मिळवायचा.” ती ठरवते की रेवला त्याच घरात सून म्हणून पाठवणार आहे.

💔 रेवतीचा निर्णय

दुसरीकडे, यश बाहेर निघालेला असतो. पण तितक्यात त्याला रेवतीचा कॉल येतो. तो खूप खुश होतो आणि तिला सांगतो की, “आपण उद्या कुठेतरी फिरायला जाऊयात.” पण रेवती रागातच म्हणते, “यश, मला असं वाटतं की आपण आपलं हे नातं इथेच थांबवावं.”

यश रेवतीला फोनवर बोलत आहे

रेवतीचे असे बोलणे ऐकून यशला धक्काच बसतो. तो तिला विचारतो, “रेव, काय झालंय? तू अशी का बोलतीये?” रेवती उत्तर देते की, “यश, मी तुझं प्रेम डिझर्व्ह करूच शकत नाही.”

🥺 लीला आणि रेवतीच्या संवादात ताण

लीला आणि एजे मस्त खीर खात असतात. लीला म्हणते, “एजे, खरंच तुमच्या हातात जादू आहे. तुमच्यावरन अन्नपूर्ण प्रसन्न आहे.” एजे हसून म्हणतात, “लीला, ही खीर तू बनवली आहेस, मी नाही.” लीला उत्तर देते, “हो एजे, पण तुम्ही सांगितली तशी मी खीर बनवली आहे.”

नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

लीला पुढे म्हणते की, “एजे, मी लहानपणापासून इतके गोंधळ घातलेत, की कोणती गोष्ट व्यवस्थितपणे करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही.” एजे तिला सांगतात, “लीला, आता ते सगळं विसरून जा. तू मोठी झाली आहेस.”

🎮 गेम आणि प्रेमाची गूढता

लीला एजेना एक गेम खेळायला सांगते. एजे नकार देतात, पण लीला आग्रह करते. शेवटी, एजे गेम खेळायला तयार होतात. गेम असा आहे की, “मी जो शब्द घेईल, तो तुम्ही ऐकल्यावर तुमच्या मनात जी वस्तू येते, ती तुम्ही बोलायची.” एजे सहमत होतात.

लीला आणि एजे गेम खेळत आहेत

गेम खेळताना, जेव्हा लीला “प्रेम” बोलते, तेव्हा एजे काहीच उत्तर देत नाहीत. ते फक्त शांतपणे लीला कडे बघत असतात. लीला म्हणते, “एजे, सॉरी, पण मला असं वाटलं होतं की मी प्रेम बोलल्यानंतर तुम्ही अंतरा ताईंचं नाव घ्याल.”

📞 रेवतीचा कॉल आणि चिंता

दिवसाच्या दुसऱ्या दिवशी, एजेच्या लक्षात येतं की त्यांच्या मोबाईलवर रेवतीचे खूप मिस कॉल आहेत. ते तिला कॉल करतात, पण ती काही कॉल रिसीव्ह करत नाही.

एजे रेवतीला कॉल करत आहेत

एजे लीला आवाज देऊ लागतात, पण लीला ऐवजी विश्वा त्याठिकाणी येतो. एजे त्याला लीला बद्दल विचारतात. विश्वा सांगतो की, “मी मगाशी लीला वहिनींना घाई घाईत बाहेर पडताना बघितलं.”

🏡 लीला आणि रेवतीचा संवाद

लीला घरी आल्यावर रेवतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करते, पण रेवती बेकरीच्या कस्टमर सोबत फोनवर बोलत असते. लीला विचारते, “रेवू, हे सगळं काय चाललंय तुझं?” रेवती उत्तर देते, “ताई, मी आता बेकरीकडे पूर्ण लक्ष द्यायचं ठरवलं आहे.”

रेवती बेकरीच्या कस्टमरसोबत बोलत आहे

लीला म्हणते, “खरं खरंच सांग, नेमकं काय झालंय? आपण दोघी सख्ख्या बहिणी नसलो ना तरी सख्यापेक्षा जास्त आहोत.”

👀 आगामी भागांची उत्सुकता

या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की रेवतीचं आणि यशचं नातं तुटलंय. हे जेव्हा कालिंदीला कळतं, तेव्हा ती सगळा राग लीलावर काढते. कालिंदी रागातच लीलाला खोलीत घेऊन जाते.

नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा

मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल join करा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom