🍯 शुद्ध सेंद्रिय गुळ : आपल्या सर्वाना माहिती आहे शेतामधील ताजा ऊस जेव्हा आपण खातो किंवा बाजारामध्ये उसाचा रस पितो ,तेव्हा आपल्याला बराचश्या पोटाच्या आजारापासून म्हणजेच पोटामधील आजरांवर कायमचा नाही परंतु तात्काळ तरी आराम मिळतो.विशेषता पिताला किंवा पोट गच झाले असेल तर लगेचच ऊस खाल्यावर पचणास मदत होते.🍯
अगदी तसेच उसाचा रस शिजवून बनवलेला गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उसाच्या शेताभोवती मोठमोठ्या कढईत गुळ शिजवला जात असल्याचे आपण जुन्या काळी पाहिले आहे, आजूनची काही जागी या संस्कृतीला लोकांनी जपले आहे,जरी बाजारामध्ये एकदम फास्ट तयार होणाऱ्या गुळाच्या मशनरी उपलब्ध असूनही जुन्या पद्धतीने कढइमध्ये ऊस अटवला जातो, गूळ शिजवला जातो.आजकाल गूळ मशिनने बनवला जात असला तरी यंत्राने बनवलेल्या गुळाला पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गुळासारखी चव येत नाही.गुळाची चव उसासारखी गोड असते, पण आजच्या काळात तुम्हाला खरा आणि शुद्ध गूळ बाजारात क्वचितच मिळेल.🍯परंतु यावर एक टीप आहे शेवटी.पहिले पाहू गुळामध्ये असलेली पोषक तत्वे.[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
पोषण मूल्य 👌💪
Calories | 383 |
Carbohydrates | 97 grams |
Protein | 0.4 grams |
Calcium | 85 mg |
Fiber | 0.6 grams |
Iron | 11 mg |
Fat | 0.1 gram |
Phosphorus | 20 mg |
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
गुळाचे गुणधर्म 👇
- गोड गुळामध्ये गरमपणा असतो.
- गूळ खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात रक्त वाढते. (जेवनानंतर एक छोटा खडा खावा ).
- गुळ खाल्याने भूक वाढते.
- गुळ तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकतो .
- गूळ खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो.डोळ्यांना पोषक तत्वे भेटतात .
-
पाण्यात गूळ मिसळल्यास त्याचा प्रभाव शरीरासाठी थंड होतो.
[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
गुळाचे फायदे आणि उपयोग 👇
पोटाची काळजी : जर तुम्हाला जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असेल तर इतर साखरेचे पधार्थ किंवा साखर खाण्याऐवजी गूळ खा, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून लगेच आराम भेटेल आणि तुमची पचनक्रियाही चांगली होईल. जर तुम्हाला गॅसची समस्या जास्त असेल तर रोज पाण्यात गुळ मिसळून सेवन करा, तुमची समस्या बर्याच अंशी दूर होईल.
महिलांसाठी वरदान : महिला आपल्या त्वचेची सर्वात जास्त काळजी घेतात.आणि जर तुम्ही रोज गुळाचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतो .आणि तुमच्या त्वचेची काळजी घेतो. यासोबतच जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येण्याची समस्या असेल तर अशा दिवसांमध्ये गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
उत्साहवर्धक आणि वेदना कमी करणे : जर तुम्हाला कुठलही काम करत असताना अचानक थकवा जाणवत असेल तर अशा वेळी गुळाचा एक खडा तोंडामध्ये धरा.किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाण्यात किंवा दुधात गूळ मिसळून घेऊ शकता, माझ्यावर विश्वास ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा कुणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा स्वताः त्याचा अनुभव घ्या.कारण ही अशी गोष्ट आहे जिचा फायदा जरी नाही झाला तरी तोटा नक्कीच होणार नाही .
उन्हाळ्याचे फायदे : उन्हाळ्यात पोटदुखी, मासिक पाळी, निमोनिया, साखर इत्यादींवर गूळ उपयुक्त आहे. परंतु ते प्रमाणाच्या रूपात घ्या, त्यानंतर ते तुमचे नुकसान करणार नाही, फक्त तुम्हालाच फायदा होईल.[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे 🙋❓️
FAQ :
उत्तर : गुळाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते.
उत्तर : तुम्ही ताकासोबत गुळाचे सेवन करू शकता.
उत्तर : उन्हाळ्यात गूळ खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते.
उत्तर : होय, जेवणानंतर दररोज सुमारे 10 ग्रॅम गूळ खाण्याची शिफारस केली जाते. प्रत्येक 10 ग्रॅम गुळात 16 मिलीग्राम खनिजे असतात.[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
टीप : कधीही मार्केट मध्ये गुळ खरेदी करता त्या वेळी गुळाची गुणवत्ता चेक करून गुळ खरेदी करा ,विशेषता गुळाचा कलर हलका गर्द आणि तो तोडण्यासाठी किती soft आहे ,ना की खूप कडक आहे .soft गुळ हा एक चांगल्या गुळाची गुणवत्ता दर्शवतो .[su_divider top=”no” style=”dotted” divider_color=”#000000″ link_color=”#000000″]
2 thoughts on “रोज जेवणानंतर थोडा शुद्ध सेंद्रिय गुळ खाण्याने शरीराला होणारे फायदे : Jaggery Benefits 2023”