अप्पी आमची कलेक्टर: 15 फेब्रुवारी आजचा भागाचा आढावा
🌟 दीपा आणि तिचे स्वप्न
या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा बालकणीमध्ये उभी असते आणि खूपच खुश असते. ती स्वतःशीच म्हणत असते की, “ही कलेक्टर मॅडम तर खूपच श्रीमंत दिसते.” एकदा का मला हिच्या कपाटाची किल्ली सापडली की, भरपूर दागदागिने आणि पैसे मिळतील. मग मी माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन लांब कुठेतरी निघून जाईल. आम्ही सगळेजण आनंदात राहू आणि मग मला त्या दाद्याची भीती सुद्धा नसेल.”
🚶 अर्जुनचा सल्ला
दीपाच्या आनंदामध्ये अर्जुन त्याठिकाणी येतो आणि तिला म्हणतो, “हे काय चाललंय? तुला कळतंय का हा कलेक्टर मॅडमचा बंगला आहे?” अर्जुन सांगतो की, “घरातील सगळेजण अप्पीला एकदम व्यवस्थित ओळखतात. तू प्लीज असं शिट्ट्या वगैरे वाजवू नको नाहीतर सगळ्यांना संशय येईल.” अर्जुनच्या या चिंतेमुळे दीपा काळजीत पडते.
💔 अपर्णाचा त्रास
दूसरीकडे, खऱ्या अप्पीला शुद्ध आलेली असते. मात्र, ती कुठे आहे याची तिला थोडीसुद्धा कल्पना नसते. खूप तहान लागल्यामुळे ती शेजारीच असणाऱ्या माठातील पाणी घेण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला ते देखील घेता येत नाही. पाण्याविना ती तडफडत राहते.
🎉 अपर्णाची परत येणे
अपर्णा परत आल्यामुळे घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. स्वप्नील आणि रूपाली एकमेकांशी अपर्णा, अर्जुन, आणि अमोल विषयीच बोलत असतात. स्वप्नील म्हणतो, “अर्जुनने स्वतःवर आणि स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवला.” रूपाली सांगते की, “अपर्णा तुम्हाला बदलल्यासारखी वाटत नाहीये का?”
🧐 अपर्णाच्या बदलाची चर्चा
स्वप्नील म्हणतो की, “ती इतक्या मोठ्या अपघातातून परत आली आहे. तिच्यामध्ये बदल तर झाला असणारच ना?” रूपाली देखील सांगते की, “मला अमोलची खरंच खूप काळजी वाटायची.” हे सर्व बोलून, रूपाली अपर्णाची काळजी घेण्यासाठी सज्ज होते.
📞 मोनाचा कॉल
मोना तिच्या माहेरी कॉल करून अपर्णा परत आल्याचं सगळ्यांना आनंदाने सांगत असते. दीपक त्या ठिकाणी येतो आणि मोनाला विचारतो, “आज तर तू खूपच खुश दिसते.” मोना उत्तर देते की, “आत्तापर्यंत मला छोट्या सरकारांची खूप काळजी वाटायची, पण आता वंस परत आल्या आहेत.” दीपक मोनाची माफी मागतो की, “इतके दिवस मी तुला वेळ देऊ शकलो नाही.”
🙏 बापूंचे आभार
बापू देवापुढे हात जोडून त्याचे आभार मानत असतात. ते म्हणतात, “विठूराया, यापुढे तुला केलेला नवस कधीही हे घर अर्धवट ठेवणार नाही.” कदम त्या ठिकाणी येतात आणि बापूंचा आनंद बघून त्यांनाही खूप आनंद होतो.
🔍 आर्याचा संशय
आर्या पोलीस स्टेशनमध्ये असते आणि तिला अपघातानंतर चिंचोके आणि गायतोंडेंनी घेतलेला शोध आठवत असतो. ती चिंचोक्याला सांगते की, “आम्ही इतका शोध घेऊन सुद्धा अपर्णा मॅडम कशा सापडल्या नाहीत?” चिंचोके उत्तर देतो की, “साहेबांचा अनुभव मोठा आहे.”
📖 अर्जुनचे कौतुक
दुसऱ्या दिवशी सकाळी बापू आणि कदम पेपर वाचत असतात. पेपरमध्ये अर्जुनच कौतुक केलेलं असतं. अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि सगळेजण त्याचं खूप कौतुक करत असतात. अर्जुनला मात्र अपराधी वाटत असतं.

🚀 पुढील भागांची अपेक्षा
मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला join करा.आपल्या आवडत्या पात्रांच्या कथा आणि त्यांच्या संघर्षांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तयार राहा!