अप्पी आमची कलेक्टर: 27 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा
🎭 आरंभ आणि हॉस्पिटलच्या गप्पा
या मालिकेच्या आजच्या भागात, अपर्णा आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये येतात. तिथे अमोल त्यांचीच वाट बघत बसलेला असतो. अमोल त्यांना सांगतो की, “तुम्हाला माहिती आहे का, हॉस्पिटलच्या पाठीमागे एक कॅनटीन आहे आणि मला तिथे फिरायला जायचंय.”
अपर्णा आणि अर्जुन त्याला समजवतात की डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. अमोल नाराज होतो, पण अपर्णा आणि अर्जुन त्याला आश्वस्त करतात की एकदा तो बरा झाला की, ते त्याला सगळीकडे फिरायला घेऊन जातील.
अमोलच्या या गप्पांवर डॉक्टर येतात आणि त्याला विचारतात की त्याला काही त्रास तर होत नाही. अमोल नकार देतो, आणि डॉक्टर त्याला सांगतात की त्याची रिकव्हरी चांगली होत आहे. जर याच स्पीडने त्याची रिकव्हरी होत राहिली, तर त्याला दोन दिवसात डिस्चार्ज दिला जाईल.
Click पारू 26 डिसेंबर full एपिसोड Click
🎲 खेळणी आणि आनंद
अर्जुनने अमोलसाठी जी खेळणी आणलेली असतात, ती त्याला दाखवतो. त्यामुळे अमोल खुश होतो आणि तिघे सापशिडी खेळायला लागतात. यामुळे अमोलचा छान वेळ जातो.
दुपारी, अपर्णा अमोलला छान गोष्टी सांगते आणि त्यामुळे अमोल मस्त झोपी जातो. अपर्णा सुद्धा त्याला गोष्ट सांगता सांगता झोपी जाते. अर्जुन येतो तेव्हा त्याला दोघांची अवस्था पाहून हसू येते.
🏥 व्हीलचेअर आणि झाडे
दुसऱ्या दिवशी, अपर्णा आणि अर्जुन अमोलला व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलमध्ये फिरवत असतात. पण अमोलला ते काही आवडत नाही. त्याला बाहेर झाडांजवळ जायचं असते.
तितक्यात, दीपक एका झाडाची कुंडी घेऊन येतो आणि म्हणतो, “तुम्हाला झाडाजवळ जाता येत नाही, म्हणून मी झाडच इथे घेऊन आलो.” अमोल मोठ्याने ओरडतो, पण डॉक्टर येऊन विचारतात की ही कुंडी इथे कोणी आणली आहे.
दीपक डॉक्टरांना सांगतो की तो अमोलसाठी झाड आणला आहे. डॉक्टर म्हणतात की ती कुंडी जागच्या जागी ठेवावी लागेल, पण शेवटी अमोलच्या आनंदासाठी ते पाच मिनिटे राहू द्यायचा निर्णय घेतात.
🌾 शेतातील गप्पा
बापू आणि कदम हॉस्पिटलमध्ये येतात आणि अमोलला शेतातील गोष्टी सांगतात. यामुळे अमोल आनंदात असतो. अपर्णा त्याच्या रूममध्ये काम करत असते आणि अमोल स्वतःच्या पायांवर चालायला सुरुवात करतो.
अपर्णा हे बघून खूप खुश होते. त्यानंतर, बोना हॉस्पिटलमध्ये येतो आणि अमोलला सांगतो की त्याला लवकरच फॉलोवर्स मिळतील आणि लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतील.
📋 अपर्णाचे विचार
अर्जुन अपर्णाला विचारतो की ती काय विचारते आहे. अपर्णा सांगते की संकल्पनेने त्यांच्या बाबतीत जे काही केलं त्याचा त्रास झाला आहे. ती विचारते की किती लोक खोटी कागदपत्रे बनवून इतरांना त्रास देत आहेत.
अर्जुन म्हणतो की आधी अमोलला बरा होऊ दे, पण अपर्णा ठरवते की तिला हे काम आता हातात घ्यायचं आहे. ती गायतोंडेंना सांगते की पोलिसांना हॉस्पिटल, शाळा आणि बँका अशा ठिकाणी छापा मारायला सांगा.
🏆 अमोलचा डिस्चार्ज
अमोलने स्वप्नील, दीपक, मोना, आणि रूपाली यांना बोलावून घेतले आहे. तो त्यांना सांगतो की त्याला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे ते सर्व मिलकर माबांसाठी काही स्पेशल प्लॅन बनवतात.
मोना म्हणते की अमोल आणि त्याच्या बायकोचा गृहप्रवेश एकत्र करायचा असल्याने ती कल्पना सर्वांना आवडते. डॉक्टर अमोलला डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला कोणकोणती पथ्य पाळायची ते सांगतात.
🌟 नवीन चॅलेंजेस
डॉक्टर अपर्णा आणि अर्जुनला सांगतात की अमोलला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने काळजी घ्यायची आहे. अपर्णा म्हणते की आता आपल्याला हे नवीन चॅलेंज स्वीकाराव लागणार आहे.
अर्जुन हसतच हो म्हणतो. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला फ्री टेलिग्राम चॅनेल join करा