अप्पी आमची 24 डिसेंबर कलेक्टर: आजचा भाग विश्लेषण
🚑 भागाची सुरुवात
या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन अमोलला अम्बुलन्स मध्ये बसवतो आणि मग त्यानंतर बापू अमोल स्वप्नील आणि रूपाली हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. इतर सगळेजण अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नासाठी घरात जाण्यासाठी निघतात.
👀 अनपेक्षित भेटी
तितक्यात त्यांच्या लक्षात येतं की गेटवर कोणीतरी उभा आहे. त्यामुळे ते सगळेजण आश्चर्याने त्या व्यक्तीकडे बघू लागतात. तो व्यक्ती मागे फिरून बघतो तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून संकल्प ढोबळे असतो. त्याला बघून या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो.
Click करा अपी आमची 27 डिसेंबर एपिसोड click
😲 संकल्पाचा धमाका
संकल्प हसतच म्हणतो की, “काय अर्जा काय अप्पे, पुन्हा एकदा लग्न करताय एका पोरासाठी?” हे ऐकून हे दोघेही जण खूप चिडतात. संकल्प हसतच म्हणत असतो की करा तुम्ही लग्न करा, पण या सगळ्याचा काही फायदा होणार नाही कारण इकडे तुमचं लग्न होणार आणि तिकडे तुमचा तो मुलगा मारणार.
👊 अपर्णाची प्रतिक्रिया
हे ऐकून अपर्णा संकल्पाच्या कानाखालीच मारते. मात्र संकल्प हसतच म्हणत असतो की, “अगं अप्पे, अजूनही तुझी धार अगदी तशीच आहे.” पण तू लगेच मला मारू नको कारण तुला अजून खूप काही ऐकायचं आहे.
🩺 अमोलची स्थिती
संकल्प त्यांना सांगतो की जेव्हा त्या आमल्याला पहिल्यांदा चक्कर आली होती, तेव्हा त्याला कॅन्सर आहे हे क्लिअर झालं होतं. “माझ्या मुळे तुमच्या आमल्याची अवस्था माझ्याच मुळे झाली आहे,” असे तो सांगतो.
💔 अपर्णाचा धक्का
संकल्पच्या या बोलण्याने सर्वांच्या पायाखालची जमिन सरकते. त्यांना अमोलला जेव्हा पहिल्यांदा चक्कर आली होती, तेव्हा घडलेला प्रत्येक प्रसंग आठवतो. संकल्प हसतच म्हणतो की, “तुमच्या त्या आमल्याची अवस्था माझ्याच मुळे झाली आहे.”
💥 अर्जुनचा संताप
संकल्पाच्या या बोलण्यावर अर्जुन त्याला मारायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की, “संकल्प ढोबळे, आम्ही कधीच तुझ्या वाट्याला गेलो नाही.” संकल्प हसतच म्हणतो की, “अरे अर्जा, आता हा साधूचा वेश कशाला आणतोयस तू?”
⚔️ संघर्षाची तीव्रता
अर्जुन संकल्पाला जमिनीवर पाडतो आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारतो. मात्र संकल्प हसतच असतो. अर्जुन त्याचे हात बांधतो. संकल्प हसतच म्हणतो की, “अरे अर्जा, माझे हात नको बांधू, मी कुठेही पळून जाणार नाही.”
⚖️ कायद्याचे पालन
अपर्णा तिथे येते आणि अर्जुनच्या हातातून गण काढून घेत म्हणते की, “अर्जुन, तू कायदा हातात घेऊ नको.” संकल्प तिला म्हणतो की, “जर तू माझ्याशी लग्न केलं असतं तर मी सुद्धा तुला आनंदातच ठेवलं असतं.”
🏥 हॉस्पिटलमध्ये घडामोडी
दुसरीकडे बापू, रूपाली, स्वप्नील अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. रूपाली खूप रडत असते पण अमोल तिला म्हणतो की, “मोठीमा, तू रडू नको, मला काही होणार नाही.”
💍 लग्नाची विधी
दुसरीकडे अपर्णाच्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते. मोना आणि दीपक त्या दोघांना मुंडवळ्या बांधतात. पण ते दोघेही खूप रडत असतात.
⚠️ क्रिटिकल सिच्युएशन
ऑपरेशनच्या दरम्यान अचानक क्रिटिकल सिच्युएशन निर्माण होते. अर्जुन आणि अपर्णच्या लग्नाची मंगलाष्टक सुरू असतात, पण गुरुजी सुद्धा रडत असतात.
😱 अमोलची इच्छा
अर्जुन आणि अपर्णचा लग्नाचा विधी पार पाडल्यानंतर ते दोघेजण लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात त्या दोघांना असा भास होतो की अमोलने त्यांचा हात पकडलाय.
📅 पुढील भागांची अपेक्षा
मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट साठी आपल्या टेलिग्राम चॅनेल join करा. आजचा भाग खूपच उत्कंठावर्धक होता!