पारु | 29 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा

पारु | 29 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा

 

पारु: 29 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा

😢 नानूची दु:खद अवस्था

या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नानू एकटाच किचनमध्ये रडत बसलेला असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती नानू जवळ जाऊन बसते. नानूची अवस्था बघून तिला सुद्धा वाईट वाटत असते. मात्र नानू तिच्याकडे बघतही नाही.

नानू किचनमध्ये रडत बसलेला

😂 पारूचा प्रयत्न

पारू नानूला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणते की, “नानू, वाढदिवसाच्या दिवशी असं कोणी रडत बसत नाही. जर वाढदिवसाच्या दिवशी आपण असं दुःखी होऊन बसलो ना तर देव बाप्पा पुढच्या जन्मात आपल्याला माकड बनवतो.” आणि मग ती हसू लागते. मात्र नानूच्या चेहऱ्यावर काही हसू येत नाही.

पारू नानूला हसवण्याचा प्रयत्न करते

💬 पारूचा संवाद

त्यामुळे पारू त्याच्याशी शांतपणे बोलून त्याला समजावू लागते. ती म्हणते, “नानू, मला माहित आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुला मी आवडते आणि मला सुद्धा तुझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो.”

त्यानंतर ती पुढे म्हणते, “तुझ्यासारखा मित्र मला शोधूनही सापडणार नाही. आपल्यामध्ये मैत्रीचं प्रेम आहेच ना रे, पण याचा अर्थ असा होत नाही की माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे.”

पारू नानूला समजावते

🤝 मैत्रीचे वचन

पारू नानूला वचन देते की, “ही मैत्री ना मी शेवटपर्यंत निभावेल. आपण एकमेकांपासून कितीही दूर असलो ना तरीही आपली मैत्री कायम राहील.”

आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो. पारू नानूला समजवण्याचा प्रयत्न करत असते. नानू हसून म्हणतो की, “पारू, मी ना पहिल्याच दिवशी तुला ओळखलं होतं.”

आदित्य पारू आणि नानूचे संवाद

Click तुला शिकवीन 28 डिसेंबर click करा

🎂 केक आणि माफी

पारू नानूला केक भरवते, त्यामुळे नानू खूप खुश होतो. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. आदित्य नानूला केक भरवत त्याची माफी मागतो. तो म्हणतो, “नानू, मला माफ कर. मी मगाशी तुझ्यावर चिडलो.”

आदित्य पुढे म्हणतो, “तू वाटेल ते बोललो, पण मी काय करू? माझ्यावर पारूची जबाबदारी आहे.”

आदित्य नानूला केक भरवतो

🗨️ आदित्यची चिंता

आदित्यच्या बोलण्यानंतर पारू मनोमन खुश होते. आदित्य पुन्हा पुन्हा नानूची माफी मागत असतो, आणि त्यामुळे नानू म्हणतो, “आदित्य सर, एवढं काही नाहीये. तुम्ही पुन्हा पुन्हा माझी माफी मागू नका.”

त्यानंतर आदित्य त्याला विचारतो, “आता आम्ही निघालो तर चालेल ना?” त्यावर नानू म्हणतो, “हो, तुम्ही थोडा वेळ रिसेप्शन जवळ थांबा. मी लगेच येतो.”

आदित्य नानूला विचारतो

👛 पारूची पिशवी

आदित्य आणि पारू बाहेर जातात. अनुष्का त्या ठिकाणीच असते. नानू पटकन पारूची पिशवी घेऊन त्या ठिकाणी येतो. आदित्य त्याला विचारतो, “काय रे, काय झालं?” तर नानू पारूची पिशवी दाखवत म्हणतो, “काही नाही, हे राहिलं होतं.”

ते ऐकून आदित्य आणि पारूला हसू येतं. त्यानंतर आदित्य नानूचा निरोप घेतो आणि गाडी जवळ जातो.

नानू पारूची पिशवी दाखवतो

👩‍❤️‍👨 अनुष्काचे मार्गदर्शन

अनुष्का नानूला पारू पासून दूर करत म्हणते, “नानू, एक गोष्ट लक्षात ठेव. जरी आत्ता तुला पारूने नकार दिला असला ना तरी तू काही शांत बसू नको.”

ती पुढे म्हणते, “तू सतत तिला कॉल करत राहा. आणि एकदा का आम्ही तिकडे गेलो की, मी तुला तिच्या वडिलांचा नंबर सुद्धा पाठवते.”

अनुष्का नानूला मार्गदर्शन करते

💔 पारूच्या भावना

नानू पारूला तिची पिशवी देतो. पारू म्हणते, “नानू, तुझ्यासोबत वेळ कसा गेला ना, ते खरंच कळलं नाही. खरं तर आम्ही इथे त्या पुरस्कार समारंभासाठी आलो होतो.”

त्यानंतर नानू पारूला सांगतो की, “पारू, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या नवऱ्याची काळजी घे.”

पारू नानूला सांगते

💪 प्रेमाची लढाई

नानू पारूला सांगतो की, “पार्वती, काही झालं तरी हार मानायची नाही. तुझ्या प्रेमासाठी शेवटपर्यंत लढायचं मी आहे तुझ्यासोबत.”

त्यावर पारू सुद्धा हो म्हणते आणि मग ती नानूचा निरोप घेऊन तेथून निघते. नानू मात्र पारूच्याच आठवणींमध्ये हरवलेला असतो.

नानू पारूच्या आठवणींमध्ये हरवलेला

🚗 गाडीतल्या विचारांचे क्षण

आदित्य, अनुष्का, पारू पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. गाडीमध्ये असताना पारू एकदम शांत बसलेली असते. त्यामुळे आदित्य तिला म्हणतो, “काय ग, पारू, मगाशी निघताना तू बराच वेळ नानू सोबत बोलत होतीस.”

त्यानंतर आदित्य विचारतो, “तू त्याचं प्रपोजल एक्सेप्ट केलं की काय?” आणि पारू हसून म्हणते, “हो, आदित्य सर.”

पारू आदित्यला उत्तर देते

🌲 जंगलातील आठवणी

आदित्यच्या बोलण्यानंतर त्याला जंगलात पारू सोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात. तो त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. पारूला सुद्धा सतत आदित्य सोबत घालवलेले क्षण आठवत असतात.

ती मनाशी म्हणत असते, “आदित्य सर, जरी व्यक्त होत नसले ना तरी मला माहित आहे त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे.”

आदित्य जंगलातील आठवणींमध्ये हरवलेला

🙏 प्रार्थना

पारू देवाकडे आदित्यसाठी प्रार्थना करते. अनुष्का मात्र मनाशी विचार करत असते की, “आदित्याला मारण्याची ही संधी सुद्धा हुकली.”

दुसरीकडे संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब देवीच्या मंदिरामध्ये आलेलं असतं.

किर्लोस्कर कुटुंब मंदिरात

📝 लग्नाच्या पत्रिका

दामिनी अहिल्याला विचारते की, “आज आपण इथे सगळेजण का आलो आहोत?” तर अहिल्या म्हणते, “देवीचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते.”

मारुती त्या ठिकाणी येतो. अहिल्या त्याला सांगते की, “आज या मंदिरामध्ये आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाच्या पत्रिकेचं वाचन होणार आहे.”

आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाच्या पत्रिकांचे वाचन

😠 दामिनीची चिडचिड

दामिनी हसतच अहिल्याला म्हणते, “मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला हे सगळं का करायचंय ते.”

अहिल्या म्हणते, “जर लग्नपत्रिका वाचताना पारूच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं तर त्या क्षणी मी तिला हाताला धरून घरातून बाहेर काढेल.”

अहिल्या पारूच्या चेहऱ्यावरचे भाव पाहते

🔍 आदित्यची चिंता

आदित्य आणि अनुष्का पारू त्या ठिकाणी येतात. आदित्यला बघून सगळेजण खुश होतात. प्रीतम तर मुद्दाम त्याची मस्करी करत विचारत असतो, “ब्रो, तू काय काय केलं जंगलामध्ये?”

आदित्य त्याच्या बोलण्यात गप्प बसतो.

आदित्यच्या मित्रांची मस्करी

📖 पुढील भागांची तयारी

आदित्य अहिल्याला सांगतो, “आई, मला माफ कर, पण खरं तर मलाच जंगलात जायचं होतं.”

  1. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम पेज जॉईन करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom