नवरी मिळे हिटलरला:21 डिसेंबर

नवरी मिळे हिटलरला:21 डिसेंबर

 

नवरी मिळे हिटलरला:21 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा

 

🌟 भागाची सुरुवात

या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजेंस सोबत फिरून आल्यानंतर लीला मुद्दाम सुनांना सांगते की आज मी खूप दमले आहे. कारण एजे मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले होते. त्यामुळे मी जाऊन आराम करते.

लीला आराम करते

🚴‍♀️ बाईकची काळजी

लीला बाईकची चावी दुर्गा पुढे पकडते आणि म्हणते की ही चावी जागच्या जागी ठेव. ती सरूला सुद्धा सांगते की बाईक व्यवस्थित ठिकाणी लावायला सांग. लक्ष्मीला ती म्हणते की उगाच कोणत्याही चीप हरकती करू नको, कारण ही बाईक मी एजंटच्या नावावर बुक केली आहे. जर तू काही केलस तर एजंटचं नाव खराब होईल.

लीला बाईकची काळजी घेते

📞 कॉलचा धक्का

दुसऱ्या दिवशी सकाळी, लीला छान तयार होते आणि आरशा समोर उभी राहून ऍक्टिंग करू लागते. पण तितक्यात तिला एक कॉल येतो. कंपनीचा कॉल असेल असं समजून ती कट करते, पण तिला त्या नंबरवरून कंटिन्यू कॉल येत असतो. त्यामुळे ती तो रिसीव्ह करते आणि रागातच विचारते की कोण आहे.

लीला कॉल घेत आहे

🎉 ऑडिशनची आनंदाची बातमी

त्यावर तो माणूस म्हणतो की, “लीला मॅडम, मी सनशाईन ऍड एजन्सी कडून बोलत आहे. तुम्ही मागे आमच्याकडे ऑडिशन दिली होती ना?” लीला म्हणते की हो, एकदा दिली होती, पण त्याचं काय? तो माणूस सांगतो की तुम्ही त्या ॲडसाठी सिलेक्ट झाला आहात. यावर लीला खूप खुश होते.

लीला खुश आहे

🎬 कामाची संधी

लीला विचारते की ही कशाची षड्यंत्र आहे? तो माणूस सांगतो की खूप इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे. तुम्हाला ही ऍड करायला नक्की आवडेल, आणि ही ऍड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसणार आहे. लीला विचारते की या ऍडमध्ये माझ्यासोबत अजून कोण काम करणार आहे का? तो हसत म्हणतो की तुम्ही अभिराम जहागीरदारांच्या अपोजिट कास्ट केले आहात.

लीला अभिरामच्या अपोजिट

🤔 अभिरामचा संदर्भ

लीला आनंदाने विचारते की एजे या ॲडसाठी हो म्हणाले का? तो माणूस सांगतो की नाही, त्यांना कन्विन्स करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही प्लीज त्यांना कन्विन्स करा, ते तुम्हाला नाही म्हणणार. लीला काळजीत पडते, पण ती म्हणते की ठीक आहे, मी बघते एजेंस सोबत बोलून.

लीला विचारते

👵 आजींचा आशीर्वाद

दुसरीकडे आजी देवापुढे उभ्या असतात. लीला आजींना विचारते की, “आजीन, समजा मी आणि एजे हिरो हिरोईन झालो तर तुम्हाला कसं वाटेल?” आजी हसतच म्हणतात की, “लीला, तू आणि अभिराम माझ्यासाठी खरंच हिरो हिरोइनच आहात.”

लीला आजीशी बोलत आहे

😔 आजींचा सल्ला

लीला आजींना सांगते की या ऍडमध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी माझी परवानगी आहे. आजी म्हणतात की, “तू बिंदास्त करू शकतेस.” पण त्यानंतर लीला आजींना एजंटबद्दल विचारते. आजी म्हणतात की मला त्याच्याबद्दल काही विचारू नको. ते काम तुझं, तू करायचं आहे.” लीला काळजीत पडते.

लीला आजींचा सल्ला घेत आहे

😠 दुर्गाचं राग

दुर्गा, सरू, आणि लक्ष्मी या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि चिडतात. सरू म्हणते की, “आपल्या घरात ना लीला जे म्हणते तेच होतं.” लक्ष्मी सुद्धा म्हणते की, “तू काळजी करूच नको, एजे ॲडसाठी नकारच देणार.” दुर्गा म्हणते की मागच्या वेळी लीलाने मला ब्लॅकमेल केलं होतं, पण आता या गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली आहे.

दुर्गा चिडलेली आहे

📋 दुर्गाचा प्लॅन

दुर्गा त्या दोघीजणींना तिचा प्लॅन सांगते. दुसरीकडे, लीला याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्या तिघीजणी त्या ठिकाणी येतात. दुर्गा म्हणते की, “आता हे काय नवीन नाटक आहे?” लीला आई एजे म्हणजे एक ब्रँड आहे, ते असं कोणत्याही ऍड करत नाहीत.

दुर्गा आणि लीला

📝 एजंटचा निर्णय

लीला म्हणते की दुर्गा यामध्ये तू प्लीज पडू नको. दुर्गा म्हणते की एजंटचे सगळे प्रोफेशनल निर्णय मी घेते. जर अशा कोणत्या ऍड एजन्सीला एजंट सोबत काम करायचं असेल, तर त्यांना आधी मला येऊन भेटावं लागतं. लीला म्हणते की ठीक आहे, मी त्यांना घरी बोलावून घेते.

लीला आणि दुर्गा

🤝 एजन्सीची भेट

लीला त्या ऍड एजन्सी वाल्या लोकांना घरी बोलावून घेते. दुर्गा त्यांना सांगते की तुम्हाला कळायला हवं होतं की एजे अशा कोणत्याही ॲड करत नाहीत. ते लोक म्हणतात की हो आम्हाला माहीत आहे, मात्र जर एजेंनी या ॲडमध्ये काम केलं, तर खरंच खूप चांगलं होईल.

एजन्सीची भेट

🐾 चॅरिटीसाठी काम

ते लोक सांगतात की आमच्या ऍडमध्ये जी हिरोईन आहे, ती तिचं पेमेंट चॅरिटीसाठी डोनेट करणार आहे. दुर्गा म्हणते की ते काही असलं तरी एजे या ॲडमध्ये काम करणार नाही. दुर्गा म्हणते की एजेंटचे सगळे निर्णय मी घेते आणि मला नाही चालणार.

चॅरिटीसाठी काम

😱 धक्कादायक माहिती

लीला दुर्गाला म्हणते की दुर्गा, तुझ्या सासूचा शब्द तू असा बदलू शकत नाही. एजे या ॲडमध्ये काम करणार म्हणजे करणारच. दुर्गा म्हणते की, “लीला आई, तुमची पावर इथे दाखवण्याची काही गरज नाही.” दुसरीकडे, विश्वा लोकांना घेऊन घराबाहेर येतो.

विश्वा लोकांना मदत करत आहे

👀 एजेचा सामना

तितक्यात एजे त्या ठिकाणी येतात. विश्वा घाबरतो आणि एजे विचारतात की काय झालं. विश्वा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यानंतर एजे त्या ऍड एजन्सी वाल्यांना पुन्हा घरात घेऊन येतात.

एजेचा सामना

🌐 ऍडचा हेतू

एजे त्यांना विचारतात की तुमची ऍड नेमकी कशासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, काहीतरी सोशल कॉज असल्याशिवाय मी अशा ऍड वगैरे करत नाही. ते लोक सांगतात की आमच्या ऍडमध्ये जी हिरोईन काम करणार आहे, ती तिचं पेमेंट प्राण्यांसाठी डोनेट करणार आहे.

एडचा हेतू

😔 एजेचा नकार

एजे म्हणतात की हे तर चांगली गोष्ट आहे, परंतु मला असं वाटतं की हे पर्सनल कॉज आहे ना की सोशल. त्यामुळे मी या ॲडमध्ये काम नाही करू शकत. ते ऐकून ते लोक नाराज होतात. लीला सुद्धा वाईट वाटतं.

एजेचा नकार

🎉 लीला आनंदित

एजे तेथून जाण्यासाठी निघतात, मात्र जाता जाता ते म्हणतात की तुमची जी कोणी लीड ऍक्ट्रेस आहे, ती खरंच खूप चांगलं काम करते. माझ्याकडून तिला शुभेच्छा द्या. ते ऐकून एजन्सी वाले लोक म्हणतात की सर, ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे.

लीला आनंदित

🤔 निर्णयाची गडबड

ते एजेंना सांगतात की आमच्या ऍडमध्ये जी लीड ऍक्ट्रेस आहे, ती दुसरी तिसरी कोणीही नसून लीला जहागीरदार मॅडम आहेत. ते ऐकून एजेंना धक्काच बसतो. लीला म्हणते की, “हो, एजे यांनी सकाळीच मला विचारलं होतं.”

लीला निर्णयाची गडबड

🤝 एजेचा होकार

एजे विचारतात की तू आधी कोणाला घरात बोलली होतीस का? लीला सांगते की, “हो, मी आजींची परवानगी घेतली होती आणि त्यांनी मला काम करायला परवानगी दिली होती.” एजे म्हणतात की, “ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर मी ॲडमध्ये तुझ्यासोबत नक्की काम करेल.”

एजेचा होकार

😡 दुर्गाचा प्रतिशोध

एजंटचा होकार ऐकताच सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. मात्र तीनही सुनांचा चेहरा पडतो. दुर्गा चिडलेली असते आणि म्हणते की, “जहागीरदारांच्या इमेजची काळजी मला सोडून कोणालाही नाहीये.” आता या ॲडच्या संदर्भात मला असं काहीतरी करायला हवं ज्याचं सगळं खापर त्या लीलावर फुटेल.

दुर्गाचा प्रतिशोध

🙏 देवाकडे प्रार्थना

दुसरीकडे, एजे जाहिरातीमध्ये काम करायला तयार झाल्यामुळे लीला खूप खुश असते. ती देवाचे आभार मानते आणि देवाकडे प्रार्थना करते की उद्या असं काहीतरी घडू दे ज्यामुळे माझ्यामधील आणि एजंटमधील जे अंतर आहे, ते अजून थोडं कमी होईल.

लीला देवाकडे प्रार्थना करत आहे

📅 पुढील भागांसाठी सज्ज रहा!

मित्रांनो, या मालिकेच्या full hd विडिओ मध्ये पाहण्यासाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल join करा https://t.me/+noJPnB1cAUM0YzFl

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom