नवरी मिळे हिटलरला 4 जानेवारी एपिसोड

नवरी मिळे हिटलरला 4 जानेवारी एपिसोड

 

नवरी मिळे हिटलरला: आजच्या भागाचा आढावा

 

📞 लीला आणि रेवूची गुपचूप योजना

या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजंटने सांगितल्यामुळे लीला घरातून बाहेर जाण्यासाठी निघते. ती रेवूला कॉल करायचं ठरवते, मात्र नंतर विचार करते की रेवला कॉल करायला नको, आपण तिला सरप्राईज देऊ.

लीला बाहेर जाण्यासाठी तयार होते.

त्यामुळे मग ती कालिंदीला कॉल करते. कालिंदी वैतागूनच तिला विचारत असते की काय आहे, कामाच्या वेळी कशाला फोन करते. लीला म्हणते की, “अगं मावशी, आई रेव घरी आहे की नाही हे मला तुला विचारायचं होतं.” कालिंदी रागातच म्हणते की मग तू तिलाच फोन करायचा ना, मला कशाला केला.

त्यावर लीला तिला सांगते की, “अगं मला तिला सरप्राईज द्यायचा आहे. आजींनी माझ्याकडे रेवू साठी काहीतरी पाठवले आहे.” हे ऐकून कालिंदी खुश होते आणि हसतच लीला सांगते की रेवू घरीच आहे, तू लवकर घरी ये.

🚪 घरातील गडबड

दुसरीकडे, विश्वाला एजंटचा कॉल येतो आणि एजेंटने सांगितल्यामुळे विश्वा लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. लीला घरी आल्यावर पळतच जाऊन रेवला मिठी मारते, मात्र रेवती कामामध्ये बिझी असते. ती लीला म्हणते, “ताई, प्लीज मला आधी काम करू दे, नंतर आपण बोलूयात.”

लीला रेवला मिठी मारते.

यावर लीला तिला विचारते की, “रेवू, काय झालं आहे? तू माझ्याशी अशी तुटकपणे का वागतेस?” पण रेवू काही तिच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही.

लीला म्हणते, “ताई, खरंच मला आता खूप काम आहे.” त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच बाबा त्या ठिकाणी येतात. लीला त्यांच्याकडे तक्रार करत म्हणते, “बाबा, बघा ना यश आणि रेवचं भांडण झालं आहे, पण ती माझ्याशी सुद्धा नीट बोलत नाहीये. नक्की काय झालंय ना मला कळतच नाही.”

👨‍👧 बाबांचं समजूतदारपण

बाबा म्हणतात, “हे बघ, लीला, तुझ्या लग्नाच्या वेळी तर मी काहीच बोलू शकलो नाही, पण आता रेवच्या लग्नाच्या वेळी तरी माझी अशी इच्छा आहे की तिला जे हवं ना तेच आपण करूयात. उगाच तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायला नको.” हे ऐकून लीला म्हणते, “बाबा, असं काही नाहीये.”

Click पारू 4 जानेवारी एपिसोड New क्लिक 

बाबा लीला सोबत बोलत आहेत.

मग ती त्यांना आजींनी पाठवलेल्या त्या बांगड्या दाखवते. विश्वा घरी आलेला असतो. एजे त्याला सांगतात की, “लीला माझ्यावर चिडली आहे, त्यामुळे तिला सॉरी म्हणण्यासाठी मला काहीतरी आयडिया सांग.”

त्यामुळे विश्वा एजेंना एक आयडिया सांगतो. एजेंना विश्वाने सांगितलेली आयडियाच डोळ्यांसमोर दिसू लागते. जसं की ते लीला घेऊन एका नारळ पाण्याच्या दुकानावर गेले आहेत. तो दुकानवाला दुसरा तिसरा कोणी नसून विश्वास असतो आणि तो लीला आणि एजेंना नारळ पाणी देतो.

🎤 गाणं आणि गोंधळ

लीलाचा राग जाण्यासाठी तिच्यासाठी गाणंही गायला सुरुवात करतो. मात्र त्यामुळे लीला अजूनच चिडते आणि रागातच त्यातून निघून जाते. हे सगळं असं होईल हे कळल्यावर एजे म्हणतात, “विश्वा, मी असं काही करणार नाहीये. तू दुसरा काहीतरी विचार कर.”

विश्वा आणि एजे नारळ पाण्यावर चर्चा करत आहेत.

दुसरीकडे, बाबा लीलाकडे त्या बांगड्या परत देतात आणि म्हणतात, “हे बघ बाळा, हे सगळं ठीक आहे, मात्र मला ना आता रेवच्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये.”

बाबा पुढे म्हणतात, “मुळात त्या घरात माझ्या मुलीला सुनेचा मानसन्मान मिळणारच नाहीये, मग तिने त्या घरात लग्न करून का जावं?”

👩‍❤️‍👨 प्रेम आणि संकोच

लीला म्हणते, “बाबा, असं काही नाहीये. जागीरदारांच्या घरात कोणाचाही अपमान होत नाही, प्रत्येकाला मानसन्मान मिळतो.” बाबा म्हणतात, “नाही बाळा, लीला, तुला त्या घरात सुनेचा मान मिळतो.” दुसरीकडे, माझ्या रेववर यशचं प्रेम आहे, मात्र तिला त्या घरात कधीच सुनेचा मान मिळणार नाही.”

लीला आणि बाबांमध्ये चर्चा.

बाबा पुढे म्हणतात, “मी माझ्या दोन्ही मुलींची अशी अवस्था नाही ग बघू शकत.” लीला त्यांना सांगते, “बाबा, असं काहीच नाहीये. एजेंटचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे.”

💍 रेवूची ठाम भूमिका

लीला पुढे सांगते, “ताई, मला खरंच त्या घरामध्ये लग्न करून येण्याची इच्छा नाहीये, कारण दुर्गा मॅडमने आई-बाबांचा तुझा खूप अपमान केला आहे.” रेवू म्हणते, “त्यांना तर असंच वाटते की फक्त मी पैशांसाठी यश वर प्रेम करते.”

रेवू ठामपणे बोलत आहे.

रेवू ठरवते की जोपर्यंत ती स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचारही करायचा नाही. बाबांना तिचा खूप अभिमान वाटतो.

लीला तिला म्हणते, “रेवू, तुझं म्हणणं पटतंय मला, पण तू प्लीज एकदा विचार कर. आजींनी खूप प्रेमाने या बांगड्या तुझ्यासाठी पाठवल्या आहेत.” रेवती नकार देते आणि तेथून निघून जाते.

📝 एजंट आणि विश्वाची चर्चा

विश्वा एजेंना म्हणतो, “एजे सर, तुम्ही एक काम करा. तुमचं लीला वहिनींवर किती प्रेम आहे ना, हे डिरेक्टली त्यांना सांगा म्हणजे त्यांचा राग नक्की जाईल.” मात्र ते ऐकून एजे चिडतात.

एजे विश्वाला चिडतात.

ते विश्वाला म्हणतात, “मी असं काही करणार नाहीये. तिचा राग जाण्यासाठी तुम्हाला दुसरी काहीतरी आयडिया सांग.” मग विश्वा अजून एक आयडिया सांगतो.

एजे डोक्यालाच हात लावतात आणि ते त्याला म्हणतात, “आता तू काही सांगू नको, मी जे सांगतोय ना तेवढं कर फक्त.”

🌼 लीला आणि एजेचं नातं

लीला परत घरी येते, तिचा चेहराच पडलेला असतो. आजी तिला काय झालंय ते विचारतात. लीला त्यांना त्या बांगड्या परत देत म्हणते, “आजी, माफ करा, रेवचं आणि यशचं भांडण झाले. त्यामुळे तिचा मूड ऑफ झाला आहे.”

लीला आजीला सांगते.

आजी हसून म्हणतात, “काही हरकत नाही, मी अभिराम सोबत बोलते, तो तिच्याशी नक्की बोलेल.” मग लीला खाली मन घालून तिथून जाण्यासाठी निघते.

आजी तिला थांबवत विचारतात, “लीला बाळा, तिकडे काय झालं आहे हे तुला पूर्णपणे माहिती आहे?” ते ऐकून लीला मान हलवते.

💐 फुलांचा आनंद

लीला तिच्या खोलीत जाते. एजे त्या ठिकाणीच असतात. लीला त्यांना बघत विचारते, “तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सॉलिड करणार होतात ना?” एजे म्हणतात, “हो.” मग त्यांनी लीलासाठी जो बुके आणलेला असतो, तो तिला देतात.

लीला एजे कडून फुलांचा बुके घेत आहे.

लीला पांढरी फुलं बघून खुश होते. ती आनंदाने म्हणते, “एजे, या आधी कधीच कोणीच मला फुलं दिली नाहीत. खरंच मला खूप आनंद झाला आहे.”

त्यानंतर ती मुद्दाम एजेंना विचारते, “एजे, तुम्ही मला पांढरी फुलं का दिली?”

🌹 पुढील भागांमध्ये काय घडणार?

लीला खुश होते, पण तिला हे फुलं द्यायला हवीत कारण तिच्या मनापेक्षा त्याच्या मनाला शांत राहण्याची जास्त गरज आहे. एजे तिच्याकडे रागातच बघू लागतात. त्यामुळे लीला हसू लागते.

लीला हसत आहे.

लीला तिथेच असणाऱ्या दुसऱ्या फुलांकडे लक्ष जातं. ती एजेंना विचारते, “एजे, ही गुलाबी रंग फुलं सुद्धा तुम्हीच आणलीत ना?” पण त्यावर एजे काही बोलत नाही.

तितक्यात लीलाचं लक्ष तिसऱ्या बुकेकडे जातं, त्यात लाल रंगाची फुलं असतात. ती फुलं बघून तर लीला खूपच खुश होते. मग एजेंना आठवतं की विश्वास ते तीनही बुके घेऊन आलेला असतो.

🎉 न्यू इयर पार्टीची तयारी

एजंटने त्याला सांगितलेलं असतं की फक्त पांढऱ्या रंगाची फुलंच तिथे राहू दे. विश्वा म्हणतो, “आता जर मी हे दोन बुके घेऊन बाहेर गेलो आणि कोणी मला बघितलं, तर त्यांना असं वाटेल की एजे तर लीला वहिनींच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत.” त्यामुळे हे बुके सुद्धा इथेच राहू द्या.

एजे आणि लीला फुलांबद्दल चर्चा करत आहेत.

आणि मग त्यानंतर एजे याबद्दल लीला सांगतात. तिच्याकडे ते तीनही बुके देतात. त्यामुळे लीला तर खूपच खुश होते.

एजे तिची मनापासून माफी मागतात आणि “मी पुन्हा तुझ्यावर रागवणार नाही,” असंही तिला वचन देतात. लीलाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो.

मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गाने न्यू इयर पार्टीची सगळी तयारी केलेली असते. तिने गेस्ट लिस्ट सुद्धा एजेंना दिलेली असते.

एजे तिला सांगतात, “तू जास्त काही काम करू नको, कारण यावर्षी आपण ही पार्टी घरीच करणार आहोत. ही पार्टी लीलासाठी एकदम खास असायला हवी.” हे ऐकून दुर्गाला तर धक्काच बसतो. तिच्या लक्षात येतं की लीलाने एजेंना सुद्धा तिच्या प्रेमात पाडलं आहे.

त्यामुळे ती लक्ष्मी आणि सरस्वती लीला आणि एजें वेगळं कसं करायचं याचा प्लॅन करू लागतात. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या विडिओ अपडेटसाठी आपल्या  टेलिग्राम ग्रुप join करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom