अप्पी आमची कलेक्टर -18 डिसेंबर उद्याच्या भागाचा आढावा
😁 सुरुवात आणि गुपीतं
या मालिकेच्या 18 डिसेंबर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा अमोल आणि आर्या बाहेर येतात. रूपाली त्यांना विचारते की नक्की काय बोलत होता तुम्ही, मात्र आर्या हसून म्हणते की रूपाली ताई, त्या मग दोघांमधील सिक्रेट आहे. हे ऐकून अमोलही खुश होतो आणि इतर सगळेजण सुद्धा हसू लागतात.
🎉 मेहंदी आणि हळद कार्यक्रमाची तयारी
मग अमोल सगळ्यांना विचारतो की आता आपण पुढचा कार्यक्रम कोणता करायचा. रूपाली म्हणते की आता अजून मेहंदी आणि हळद बाकी आहे. त्यामुळे मग ते सगळेजण उद्याच मेहंदीचा कार्यक्रम करूयात असं ठरवतात.
अपर्णा आणि अर्जुन म्हणतात की आपण छोटासाच कार्यक्रम करूयात, मात्र अमोल ऐकत नाही. त्यामुळे मग ते मेहंदीचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या धूम धडाक्यात करायचं ठरवतात. अमोल तर खूपच खुश होतो.
💃 आर्याची मेहंदी काढण्याची तयारी
मग मेहंदी काढायला कोणाला बोलवायचं यावरून मोना आणि दीपक एकमेकांशी वाद घालू लागतात. पण तितक्यात रूपाली म्हणते की बाहेरून कोणालाही बोलवायची गरज नाही कारण आर्या खरंच खूप छान मेहंदी काढते. मी स्वतः बघितलंय.
त्यानंतर ती सगळ्या समोरच आर्याला विचारते की उद्या तू आमच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी येशील ना? पण ते ऐकून आर्याला वाईट वाटतं, ती काहीच उत्तर देत नाही.
🤔 आर्याची भावना आणि अमोलचा निर्णय
इतर सगळेजण तिच्याकडे बघत असतात, कोणाला काय बोलावं ते सुचत नाही. पण मग शेवटी अमोलच म्हणतो की आर्या मावशी, तू खरंच छान मेहंदी काढतेस का? त्यावर ती हो म्हणते. मग अमोल म्हणतो की मग ठीक आहे, उद्या तूच माझ्या माबांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी ये.
आर्या सुद्धा मग नाईलाजाने हो म्हणते. हे सगळं काही बघून गायतोंडे हसतच म्हणतात की अपर्णा मॅडम, तुमची फॅमिली खरंच खूप भारी आहे!
🌙 रात्रीची गप्पा
रात्री अपर्णा आणि अर्जुन अमोलला त्यांच्या खोलीत घेऊन जातात. अपर्णा अमोलला विचारते की तू आर्या मावशी सोबत नेमकं काय बोलला? अमोल म्हणतो की अगं माला असं वाटलं होतं की ती नाराज आहे.
मात्र त्यानंतर अपर्णा अर्जुनला म्हणते की आपण आपल्या नात्यामुळे आर्याच्या भावनांचा खेळ तर केला नाही ना? अर्जुन म्हणतो की अप्पे, आता याचा आपण जास्त विचार करायला नको.
📅 मेहंदी कार्यक्रमाची तयारी
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण मेहंदीच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात. अमोल मोनाला विचारतो की या सगळ्या तयारीचा तू ब्लॉग शूट का करत नाहीये? मोना म्हणते की या सगळ्याचा आपण कशाला ब्लॉग शूट करायचा?
अमोल म्हणतो की अगं मोमा, या लग्नाच्या तयारीमध्ये तू तुझ्या चॅनेल कडे दुर्लक्ष करून नको. माझ्या लक्षात आलंय की तू आता चॅनेलवर व्हिडिओ टाकतच नाही.
🎊 दीपकचा सरप्राईज
अमोल त्यांना म्हणतो की तुम्ही प्लीज तुमची काम करा, या लग्नाच्या गडबडीमुळे आणि माझ्यामुळे तुम्ही तुमच्या कामांकडे दुर्लक्ष करून घरात बसू नका. मग तो दीपकला सुद्धा सांगतो की मामा, तू तुझ्या कामाकडे व्यवस्थित लक्ष दे.
दीपक म्हणतो की हो भांजे, तुम्ही काळजी करू नका. एकदा का हे लग्न झालं की बघा, मी किती छान काम करतो. मोना सुद्धा म्हणते की हो छोटे सरकार, मी सुद्धा आता रोज एक चॅनेलवर व्हिडिओ टाकत जाईल, आय प्रॉमिस.
📜 लग्नाची पत्रिका
आता सर्वजण आनंदाने एकत्र येतात. अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. दीपक त्यांना एक छान सरप्राईज देतो, त्याने त्या दोघांच्या लग्नाची पत्रिका छापलेली असते. ती पत्रिका बघून सगळेच जण खूप खुश होतात.
मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. घरातील सगळेजण अमोल लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात.
🏥 हॉस्पिटलमधील गप्पा
हॉस्पिटलमध्ये अपर्णा आणि अमोल गप्पा मारत असतात. अर्जुन सुद्धा त्यांच्या सोबतच असतो. अमोलने संकल्पला म्हणजेच माणिक काकांना पत्रिका देण्यासाठी आणलेली असते.
तितक्यात संकल्प तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी येतो. अमोल त्याला मोठ्याने आवाज देत थांबवतो, त्यामुळे संकल्प घाबरतो. मात्र त्याने तोंडाला मास्क लावल्यामुळे अपर्णा आणि अर्जुनला पटकन तो काही लक्षात येत नाही.
⚠️ संकल्पाचा धोका
ते दोघेजण त्याचे आभार मानतात, म्हणतात की माणिक काका, आमच्या या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला खरंच खूप साथ दिली आहे. संकल्प फक्त मान डोलवत हो म्हणतो. मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाची पत्रिका अमोल संकल्पला देत म्हणतो की माणिक काका, तुम्ही माझ्या माबांच्या लग्नासाठी नक्की या.
त्यावर तो संकल्प हो म्हणतो. मात्र तितक्यात अर्जुनला काहीतरी जाणवतं. त्याच्या लक्षात येतं की त्याने या ऑर्डर बॉयला आधीच सुद्धा बघितला आहे.
🌀 मेहंदी कार्यक्रमाची सुरुवात
जेव्हा ते घरी येतात तेव्हा मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. रूपाली अर्जुनच्या हातावर मेहंदी काढत असते. त्यावेळी ती मोनाला सांगत असते की मोना, असं म्हणतात की जर आपल्या हातावरची मेहंदी छान रंगली ना, तर आपल्या नवऱ्याचं किंवा बायकोचा आपल्यावर खूप प्रेम आहे.
त्यावर मोना हसतच म्हणते की हो रूपाली ताई, माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आईने मला ही गोष्ट सांगितली होती. तेव्हा माझ्या हातावरची मेहंदी सुद्धा खूप रंगली होती.
💕 आर्याची मेहंदी
दीपक तर खुश होतो, मात्र त्यानंतर तो मोनाची मस्करी करत म्हणतो की अगं, पण माझ्या हातावरची मेहंदी तर अजिबात रंगली नव्हती. ते ऐकून मोना चिडते. अपर्णा आणि अर्जुन त्या दोघांमधील भांडण थांबवतात.
त्यानंतर आर्या सुद्धा त्या ठिकाणी येते. तिला बघून अमोल तर खूप खुश होतो. रूपाली तिला सांगते की तू अपर्णाच्या हातावर मेहंदी काढ.
🔮 भविष्याचा विचार
आर्या अपर्णाच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी बसते. अपर्णा तिला विचारत असते की आर्या, तू ठीक तर आहेस ना? आर्या म्हणते की हो अपर्णा मॅडम, मला काय होणार आहे. अपर्णा म्हणते की तसं नाही, पण मला खरंच ना तुझं खूप कौतुक वाटतं.
आर्या मनाशी म्हणते की अपर्णा, तू काही म्हण, मात्र माझं अर्जुनवर खरंच खूप प्रेम आहे. ते कायम राहील, मात्र फक्त त्याच्या मनाचा विचार करून मी पुढे जायचा निर्णय घेतला आहे.